मनमाड (Manmad):- मनमाडच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडिया (union bank of india)यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या शेतकरी (Farmer) आणि सर्वसामान्य नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक(Fraud) झाल्याचे चित्र आहे.
बँकेमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण
यासंदर्भात बँकेमध्ये दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मनमाड शहर पोलिसांनी बँकेच्या विमा प्रतिनिधीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनमाड शाखेमध्ये गेल्या चार-पाच दिवसापासून शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मुदत ठेवी दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी करण्यास सुरुवात केली. सकाळपासूनच कोणाचे २० लाख, कोणाचे २५ लाख, कोणाचे पाच लाख अशा मुदत ठेवी दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी आपण शांत रहा बँक आपलं नुकसान होऊ देणार नाही, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण याबाबत कुठलाही प्रकारचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने अखेर या बँकेमध्ये काही जणांनी शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरू केली. दुपारी चारच्या सुमारास बँकेमध्ये पोलीस आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली.
सकाळपासूनच बँकेत खातेदारांची मोठी झुंबड उडाली
याबाबत बँकेचे मॅनेजर (Bank Manager)अशोक सरोज यांनी मनमाड पोलीस स्थानकात एक कोटी ३९ लाखाच्या अपहरणाची तक्रार दिली. बँकेचा विमा प्रतिनिधी संदीप सुभाषराव देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल(Filed a case) करण्यात आला आहे. या फसवणुकीची व्याप्ती २० ते २५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळपासूनच बँकेत खातेदारांची मोठी झुंबड उडाली होती. या घोटाळ्याची सुरुवात सुमारे तीन वर्षां पासुन झाली असल्याचे समजते. महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांनी ठेवी स्वरूपात भरलेल्या रकमेच्या बनावट ठेवींच्या पावत्या त्याने ग्राहकांना दिल्या आहेत, त्यावरील शिक्का व सही बनावट आहे. पण महत्त्वाचा भाग असा की ज्या इन्स्ट्रुमेंट वर सदरची ठेव पावती छापलेली आहे. ती युनियन बँकेची आहे. हे इन्स्ट्रुमेंट सहजासहजी मोठ्या संख्येने या व्यक्तीला उपलब्ध कसे झाले? या इन्स्ट्रुमेंट वर इन्स्ट्रुमेंट क्रमांक छापून आलेले असतात. आपल्या शाखेतील मधल्या काही क्रमांकाचे इन्स्ट्रुमेंट गहाळ झाले आहेत, याची पुसटशी देखील कल्पना कोणत्याही कर्मचारी अथवा शाखाधिकार्यास कशी आली नाही? हा घोटाळा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू असल्याचे समजते.
या संपूर्ण घोटाळ्याची(Scam) चौकशी करणार
कतर यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणा किंवा त्यातीलच काही जणांची संदिप देशमुख बरोबर मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २४ मे रोजी बँकेचे वरिष्ठ अधिकारी येऊन या संपूर्ण घोटाळ्याची(Scam) चौकशी करणार असल्याचे समजते. २२ मे रोजी सकाळी युनियन बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्या असल्याची माहिती कळाली. शाखेतून आपल्या मुदत ठेवी तोडताना व पैसे काढताना अनेकजण दिसून आले. अनेक ठेवीदारांच्या ठेव पावत्या बनावट असल्याचेही लक्षात आले. त्यानंतर ठेवीदारांनी शाखाधिका-यांना व चौकशीसाठी जळगाव शाखेतून आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावर बोलताना चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले खातेदारांनी संयम ठेवावा, आम्ही सर्व गोष्टींची सखोल चौकशी करत आहोत. ठेवीदारांचे नुकसान होऊ देणार नाही. बँकेवरील आपला विश्वास ढासळू देवू नये. अनेकांनी बँके समोर घोषणाबाजी(Sloganism) करून परिसर दणाणून सोडला. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येने ठेवीदार आपल्या पावत्या घेऊन येत होते. पोलीस त्यांच्या पावत्यांची नोंद करून माहिती घेताना दिसून आले. एका व्यक्तीच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्रालाच काळीमा फासला गेला असल्याचे या घटनेवरून दिसून आले. ग्राहकांनी मोठ्या कष्टाने गोळा केलेला पैसा अशा पद्धतीने कोणी घेऊन पसार होणार असेल, तर बँकेच्या विश्वासाचे काय? असा संवाद नागरिक करताना दिसून आले.
बँकेत मुदत ठेवी संदर्भात मोठा गैरप्रकार
भारतीय जनता पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व आर्थिक क्षेत्रातील जाणकार नितीन पांडे यांनी देखील आज युनियन बँकेस भेट दिल्यानंतर ‘देशोन्नती’कडे (Deshonnati)प्रतिक्रिया देताना सांगितले की, बँकेत मुदत ठेवी संदर्भात मोठा गैरप्रकार झाला आहे. अनेक निष्पाप आणि आर्थिक साक्षर नसलेल्या बँक ग्राहकांचे लाखो रुपये फसले आहेत. बँकेची उप कंपनी असलेल्या विमा कंपनी प्रतिनिधीने हे कृत्य केले आहे. बँकेच्या अधिकृत परिसरात हा प्रकार सुरु असताना जबाबदार बँक अधिकाऱ्यांनी याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले का? या गैर प्रकाराची बँक कर्मचारी, अधिकारी यांना माहिती नव्हती का? की तेही सामील आहेत का? याची सखोल चौकशी होऊन संबंधित गुन्हेगारांवर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही व्हावी आणि बँक ग्राहकांना त्यांच्या मुदत ठेवी सुरक्षित असल्याची हमी बँकेने द्यावी. या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशीची मागणी अर्थ मंत्रालयाकडे(Ministry of Finance) करणार असल्याचे त्यांनी सांगीतले