हिंगोली (Amit Shah) : विधानसभा निवडणूक निमित्ताने महायुतीचे उमेदवार आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या निवडणूक प्रचार निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची 15 नोव्हेंबरला हिंगोलीत जाहीर सभा होणार आहे.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात आमदार तानाजीराव मुटकुळे यांना महायुतीतर्फे उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचारानिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची 15 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला भाजपाचे अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
या सभेला महायुतीसह मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रचारानिमित्त यापूर्वी आमदार पंकजाताई मुंडे यांची सेनगावात तर गोरेगावात शेतकरी नेते पाशा पटेल यांची जाहीर सभा झाली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची ही रेकॉर्ड ब्रेक करणारी जाहीर सभा होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.