बायपासमुळे वाहतूक सुलभता होईल: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
भंडारा (Bhandara Bypass Highway) : राष्ट्रीय महामार्ग-५३ वरील १४.८ किमी लांब भंडारा बायपास (Bhandara Bypass Highway) भंडारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक होता. नागपूर-रायपूर-कोलकाता मार्गावरील जड वाहने यापूर्वी भंडारा शहरातील दुपदरी मार्गावर जात होते. ज्यामुळे अधिक विलंब व अधिक इंधन खर्च होऊन अपघातांचा धोका निर्माण होत होता. भंडारा बायपासमुळे वाहतुक सुलभता होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज केले.
महर्षी विद्या मंदीर मैदानात आयोजित लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. प्रशांत पडोळे, आ.नरेंद्र भोंडेकर, आ.परिणय फुके, आ.संजय पुराम, आ.राजू कारेमोरे, माजी खा.सुनील मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधिक्षक नूरूल हसन उपस्थित होते.
भंडारा बायपास (Bhandara Bypass Highway) हा हरितक्षेत्र ग्रीनफील्डमध्ये अंशिक एक्सेस नियंत्रण, सर्विस रोडस्, उड्डणपुल आणि अंडरपाससह तयार करण्यात आलेला आहे. ज्यामुळे स्थानिक आणि दूरच्या वाहतुकीच्या प्रवासाचे विभाजन करुन प्रवास सुरळीत करतो. यासोबत वन्यप्राणी व वाघांच्या मार्गाचा विचार करुन अंडरपास, ध्वनी अवरोधक सोबत चेन लिंक फेसिंग यांचा समावेश केलेला आहे.
तत्पूर्वी आज सकाळी नागपूर जिल्ह्याच्या (Bhandara Bypass Highway) भंडारा रोडवरील मौदा वाय जंक्शन येथे असलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. या पुलाची लांबी १.४४ किलोमीटर असून सुमारे ८४ कोटी रुपयांच्या तरतुदीने हा पूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मौदा वाय जंक्शन वरील वाहतुकीमध्ये सुधारणा येऊन येथील दुर्घटना टळणार आहेत. यावेळी त्यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी रामटेकचे खा. श्यामकुमार बर्वे तसेच विधान परिषदेतील आ. परिणय फुके उपस्थित होते.
आज मानेगाव येथील व्हेहीकुलर ओवरपास व ब्लॅक स्पॉट सुधारणा लांबी -१.९ कि.मी, बपेरा ते तुमसर राज्य मार्ग लांबी १८ कि.मी आणि खापा ते भंडारा राज्य मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरण लांबी २८ कि.मी या तीन कामाचे डिजीटल भूमिपूजन संपन्न झाले. तसेच भंडारा बायपास व मौदा वाय जंक्शन ६ लेन उड्डाणपूल या दोन विकासकामांचे डिजीटल लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. सकाळी वैनगंगा नदीवर जलपूजन व भंडारा बायपासची पाहणी केल्यानंतर महर्षी विद्यामंदीर येथील कार्यक्रमास ते उपस्थित होते.
यावेळी खा. प्रशांत पडोळे, माजी खा. सुनील मेंढे आणि आ.नरेंद्र भोंडेकर, आ.परिणय फुके यांनीही मार्गदर्शन केले. स्वागत समारंभात महर्षी विद्यामंदीरच्या विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य सादरीकरण केले. (Bhandara Bypass Highway) कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एच.एम.सिन्हा यांनी केले.


