राष्ट्रीय महामार्ग नर्सी नामदेव ते शिरपुर, मालेगावच्या कामास मान्यता देण्याचे साकडे
हिंगोली (MLA Tanaji Mutkule) : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग १६१ सावरखेडा गावाजवळील नर्सी नामदेव टि-पाईटपर्यंत तसेच राष्ट्रीय महामार्ग ४६१ ब, हिंगोली -नर्सी नामदेव,सेनगाव, रिसोड, शिरपुर, मालेगाव ते राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ च्या उर्वरीत लांबीच्या सुधारण्याच्या कामास मान्यता देण्यासाठी हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेवुन १९ डिसेंबर रोजी विविध मागण्या मार्गी लावण्याचे साकडे घातले आहे.
हिंगोली मतदार संघातील राष्ट्रीय महामार्ग १६१ सावरखेडा ते नर्सी नामदेव टि-पॉईटपर्यंत राष्ट्रीय महामार्ग ४६१ ब नर्सी नामदेव,सेनगाव, रिसोड, शिरपुर, मालेगाव ते राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ च्या उर्वरीत लांबीच्या सुधारण्याच्या कामास मान्यता देवुन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी (MLA Tanaji Mutkule) आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच भारत सरकारच्या रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ६ फेब्रुवारी २०१८ च्या राजपत्रा नुसार श्रेणी सुधारीत करण्यात आले आहेत.
महामार्गाच्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोला यांच्या मार्फत करण्यात आले आहे. हिंगोली शहराजवळ असलेल्या नर्सी नामदेव टि-पॉईटपर्यंत रस्त्याच्या सुधारणेपर्यंत निष्कानुसार करण्यात आले आहे. उर्वरीत लांबी नर्सी टि-पॉईट, राष्ट्रीय महामार्ग १६१ हा हिंगोली शहरातुन जाते या रस्त्याच्या लांबीवर जड वाहनाची नेहमीच वर्दळ असते. सध्या उर्वरीत बि.टी. पृष्ठभागाची रुंदी ७.०० मिटर आहे. आणि ही लांबी कयाधु नदीवर मोठ्या पुलासह अरुंद आहे.
याकरीता भारत सरकारच्या राजपत्रानुसार आरसीसी नाल्याच्या बांधकामासह उर्वरीत लांबीची निकर्षानुसार सुधारणाकरून हिंगोली शहराजवळील कयाधु नदीवरील पुलाच्या बांधकास मान्यता द्यावी व भरीव निधी उपलब्ध करून द्यावा असे साकडे हिंगोली विधानसभेचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली आहे. दरम्यान आमदार तानाजी मुटकुळे (MLA Tanaji Mutkule) यांनी विजयाची हॅट्रिक केल्याने केंद्रीय मंत्री गडकरींनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी आ.रामराव वडकुते, संजय कावडे, सचिन शिंदे , डॉ. विठ्ठल रोंडगे आदी उपस्थित होते.