आखाडा बाळापूर/हिंगोली (Raksha Khadse) : कृषी विज्ञान केंद्र (Agricultural Science Centre) तोंडापुर जिल्हा हिंगोली येथे पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा १७ वा हप्ता वितरण ऑनलाईन कार्यक्रम मंगळवारी दुपारी १ वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती युवा कल्याण व क्रीडा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे (Raksha Khadse) यांची राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा. नागेश पाटील आष्टीकर, विशेष उपस्थिती आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. विप्लव बाजोरिया, आ. प्रज्ञाताई सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. राजुभैया नवघरे, आ. संतोष बांगर, जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर, अटारी संचालक डॉ. एस. के. रॉय उपस्थित राहणार आहेत.
कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर कृषी केंद्रात पंतप्रधानाच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या १७ व्या हप्ता वितरणाचा ऑनलाईन कार्यक्रम
सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संत नामदेव सेवाभावी संस्था अध्यक्ष माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. पी. पी. शेळके व कृषी विज्ञान केंद्र तोंडापुर ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्यावतीने करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) या उद्या १८ जून मंगळवारी जिल्हा दौर्यावर येत असून सकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने त्यांचे हिंगोलीकडे प्रयाण होणार आहे. सकाळी ११ वाजता (Agricultural Science Centre) कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर जि. हिंगोली येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते (Kisan Samman Yojana) किसान सन्मान योजना हप्ता वितरण कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे.