बुलढाणा(Buldhana):-मुंबईच्या आझाद मैदानावर गुरुवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ना. जाधव यांनी यावेळी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा!
आझाद मैदान मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, महायुतीने समर्पणाने संस्कृती, सन्मान आणि महिलांच्या, वंचितांच्या तसेच राज्यातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी काम केले आहे. त्याचेच प्रतीक म्हणून मुंबई येथे संपन्न झालेल्या ऐतिहासिक शपथ सोहळ्यास केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते प्रतापरावजी जाधव यांनी उपस्थित राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे आणि आजितदादा यांचे हार्दिक अभिनंदन केले. याप्रसंगी ना. जाधव यांनी महायुतीतील वरीष्ठ नेत्यांची भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण सदैव कार्यरत राहू आणि महाराष्ट्राला देशातील नंबर एक राज्य बनवू.. असा विश्वास सोशल मीडिया संदेशातून ना. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.