केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी !
बुलढाणा (Prataprao Jadhav inspected the venue) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शहरातील महामानवांच्या पुतळांचे लोकार्पण आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे 19 सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या कार्यक्रमस्थळाची पाहणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी आज सोमवार 16 सप्टेंबर रोजी केली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात आला आहे. या शिवस्मारकासह शहरातीत 26 महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील विश्रामगृहावर शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या घटक पक्षाची आढावा बैठक केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या उपस्थितीत आज 16 सप्टेंबरला घेतली. यावेळी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी 19 सप्टेंबरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर केंद्रीयमंत्री यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक शारदा ज्ञानपीठ येथील मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेच्या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. संबंधित यंत्रणेला काही सूचना यावेळी करण्यात आल्या.
यावेळी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad), आ. संजय रायमुलकर, माजी आमदार माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे प्रा. बळीराम मापारी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे व सचिन देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनुजाताई सावळे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांचेसह युतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.