केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव भूषविणार अध्यक्षपद!
बुलढाणा (Prataprao Jadhav) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) देशभरासह विदेशातही साजरी होत आहे आखाती देश अबुधाबी येथे २३ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) सहभागी होणार आहेत.
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी, या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार फेब्रुवारीला बीएपीएस. हिंदू मंदिर अबूधाबी दुबई येथे शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच निमंत्रण केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना देण्यात आला होते. या निमंत्रणाचा स्वीकार करून अबूधाबी येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti) उत्सवाच्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) सहभागी होणार असून तेथील मराठी माणसांसोबत ही संवाद साधणार आहेत.