बुलढाणा (Sanjay Gaikwad) : बुलढाणा विधानसभा (Buldhana Assembly) मतदार संघात मागील अनेक वर्षांपासून रखडलेला मॉडेल डिग्री कॉलेज (Model Degree College) व विद्यापीठ उपकेंद्र प्रश्न (Sanjay Gaikwad) आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला या इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील या क्रांतीमुळे बुलढाण्याचा शिक्षणाच्या दर्जा व बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीचे पाऊल पडत असल्याचे चित्र आहे.
आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाने बुलढाण्यात शैक्षणिक क्रांतीचे पाऊल!
बुलढाण्यातील (Buldhana Assembly) शैक्षणिक स्तर वाढावा व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात (Model Degree College) मॉडेल डिग्री कॉलेज व विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात होते. अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले मात्र त्यांनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे सदरचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून रखडलेला होता बुलढाणा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावले.
बुलढाणा जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा वाढावा आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने त्यांनी बुलढाणा येथे (Model Degree College) मॉडेल डिग्री कॉलेज व विद्यापीठ उपकेंद्र इमारत उभी राहावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी चर्चा केली. पश्चात आज या विषयावर प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आले या बैठकीत संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू तसेच संबंधित अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बुलढाणा येथील या इमारतीस 17.73 कोटी रुपये मंजूर करण्यात आले यातील पहिला टप्पा म्हणून आठ कोटी रुपये लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून इमारत परिसरात अकॅडमी बिल्डिंग प्रशासकीय भवन गर्ल्स हॉस्टेल जेन्ट्स हॉस्टेल स्पोर्ट ग्राउंड तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवासस्थान उभे करण्यात येणार आहे.
बुलढान्यातच मिळणार रोजगार..
रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यात हातखंड असलेले आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी सदर विषयाची गांभीरे ओळखून पाठपुरावा सुरू केला. आदिवासी बहुल परिसरात शिक्षणाचा दर्जा वाढावा, परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, तंत्रज्ञान शिक्षण मिळावे या उद्देशाने आ. गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला. आज या विषयावर अंतिम मोहोर उमटवत शासनाने (Model Degree College) मॉडेल डिग्री कॉलेज व विद्यापीठ उपकेंद्र मंजूर केले. या ठिकाणी तंत्रज्ञान शिक्षण मिळाले नंतर विद्यार्थ्यांना याच भागात रोजगार देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्याचे पाऊल शैक्षणिक क्रांतीकडे वळत असल्याचे चर्चा आहे.