नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद!
औंढा नागनाथ (Unknown Dead Body) : औंढा नागनाथ येथील औंढा तलावाच्या सांडव्यातील डोहात एका व्यक्तीचा दिनांक २१ ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी.एस राहीरे, जमादार वसीम पठाण, इकबाल शेख, यांनी घटनास्थळी धाव घेतली यानंतर आधार कार्ड वरून त्या व्यक्तीची ओळख पटली असून कैलास नागोराव माघाडे वय ३७ वर्ष रा. नागेशवाडी असे मयत व्यक्तीचे नाव आहे मृतदेहाची औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली असून घटने प्रकरणी अद्याप औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात (Aundha Nagnath Police Station) नोंद झाली नसल्याची माहिती २२ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ११.३० वाजता औंढा नागनाथ पोलिसांनी दिली आहे