मेंढपाळांचे आर्थिक नुकसान
खंडाळा (Sheep death) : पावसाळा सुरू होताच मेंढपाळ सातपुड्याच्या पायथ्याशी तंबू ठोकून जनावरांसह तीन-चार महिने मुक्काम करतातः परंतु या वर्षी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे त्यांचे तंबू उडाले तर सतत चाललेल्या चार दिवसांच्या पावसाने मेंढ्या भिजल्याने त्यांच्यावर अज्ञात आजाराने आक्रमक केले आहे. यामुळे जवळपास ४०० मेंढ्या मृत्युमुखी (Sheep death) पडल्याची घटना घडली.
सातपुड्याच्या पायथ्याशी धोडाआखर करी शिवारात पावसाळ्यात जवळपास १५-२० मेंढपाळ (Sheep death) आपल्या जनावरांसह कुटुंबासहित मुक्कामी राहतात. परंतु ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे त्यांचे तंबू उडून गेले तर सततच्या पावसामुळे मेंढ्यांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. या अज्ञात रोगामुळे आतापर्यंत सहदेव पोकळे ५०, देवराव महारनर १२६, बाळू मोरे ८०, महादेव पोकळे १०, ज्योतीराव पोकळे १२, भाऊराव पोकळे १०, सालवलीराम कारंडे ३०, तानू पिसाळ ३६, तानू मार्कंड ४०, तसेच नाना पिसाळ, भानू पिसाळ, नाना चांडे व बालम चांडे आदींच्या ४०० मेंढ्या दगावल्या आहेत.
अजुनही दररोज ४/५ जनावरे दगावत आहेत. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश दांडले (एडीओ) व डॉ. अबोली यांच्या टीमने भेट दिली व (Sheep death) मेंढपाळांना औषधोपचारबाबत मार्गदर्शन केले. तसेच मेंढपाळाचा मुख्य व्यवसाय मेंढ्या पाळून आपली उपजीविका चालवणे असून नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे तरी शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, असे मत सरपंच धोंडाआखर योगिता पोकळे यांनी केले आहे. जि. प. सदस्या प्रमोदिनी कोल्हे यांनी मेंढपाळांच्या अज्ञात आजाराने झालेल्या नुकसानाबाबत मी शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.
तहसीलदारांकडे तक्रार
मेढपाळांनी आमचा मुख्य व्यवसाय हाच असून याच्या भरवशावर आम्ही ९ ते १० महिने पोटासाठी जनावरे घेऊन भटकत राहून आमची उपजिविका चालवितो. आता या अचानक आलेल्या संकटामुळे काय करावे सुचत नाही, तरी ज्याप्रमाणे शासन शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मदत करते, तशीच मदत आम्हाला करावी, अशी मागणी (Sheep death) मेंढपाळांनी तहसीलदार तेल्हारा यांना ५ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन केली.