वीज पडून एकजण ठार- १०जनावरे दगावली-टिनपत्रे उडाली; विद्युतपुरवठा खंडीत
नांदेड(Nanded):- जिल्हाभरात रविवारी दुपारी चार वाजतापासून विजांच्या कडकडात वादळी वार्यासह अवेळी पावसाने(Unseasonal rain) अक्षरश: थैमान घातले. निसर्गाच्या या प्रकोपात वीज पडून एका शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १० जनावरे (animals) दगावली. वादळी वार्याने गोरगरीबांच्या घरावरील टीनपत्रे उडाली तर झाडे उन्मळून पडली. विद्युत खांबही कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत (Power outage) झाला होता.
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज रविवार १२ मे रोजी तंतोतंत खरा
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज रविवार १२ मे रोजी तंतोतंत खरा ठरला. दुपारी चार वाजतापासून अवकाळी पावसाने जिल्हाभराला झोडपले. वादळी वारे व विजांच्या कोसळण्याने तर कहर केला. हदगाव तालुक्यातील धानोरा (ता) येथील शेतकरी रामराव गंगाराम वानखेडे (७५) यांचा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू (unfortunate death) झाला. बिलोली तालुक्यातील डोणगाव (खुर्द) येथे वीज पडून प्रशांत बालाजी कसल्लू व बालाजी सायन्ना कसल्लू यांच्या दोन गायी, एक कारवड व एक लहान वासरु हे वीज पडून दगावले.
जिल्हाभरातील उन्हाळी पिकांचे, फळबागांचे, पालेभाज्यांचे मोठे नुकसान
तर धर्माबाद तालुक्यातील जुन्नी येथील शेतकरी देवराव संभाजी कदम यांचे दुपारी ४ वाजता वीज पडून दोन बैल पडून मृत्यूमुखी पडले. नायगाव तालुक्यातील मेळगाव येथील शेतकरी बालाजी गोविंदराव शिंदे यांच्या बैलही वीज पडून दगावला तर बळेगाव येथील दिगांबर किशन बेलकर यांची बैल जोडी अन् टाकळी (तब) येथील शेतकरी मारोती सटवाजी मोरे यांची म्हैस वीज पडून मृत्यू पावली. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे जिल्हाभरातील उन्हाळी पिकांचे, फळबागांचे, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.