मानोरा(Washim) :- येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होवू घातली आहे. परंतू अद्यापही प्रमुख पक्षाच्या तिकीट वाटपाबाबत निश्चिती झालेली नाही. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षामध्ये अस्थिर वातावरण निर्माण झाले असुन यामुळे कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत.
राजकीय पक्षामध्ये अस्थिर वातावरण निर्माण झाले असुन यामुळे कार्यकर्ते संभ्रमात
विधानसभेची (Assembly) उमेदवारी नेमकी कोणत्या पक्षाची कोणाला मिळणार ? कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? वरीष्ठ पातळीवरून आघाड्या, युती पाहता मतदार संघात महायुती आणि महा विकास आघाडीच्या उमेदवारीवरून विविध पक्षामध्ये अस्थिरता असल्याचे कार्यकर्त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे काही पक्षामध्ये स्थिर वातावरण दिसत आहे.आपल्याच पक्षाच्या नेत्याला तिकीट मिळावे, असा अनेकांचा होरा असला तरी दुसऱ्या पक्षातील नेत्याला महायुती व महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार अशी खमंग चर्चा मतदार संघात सुरू आहे. विधानसभेच्या रणांगणात नेमके काय होणार, कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे आता काही तासातच स्पष्ट होणार आहे. मात्र राष्ट्रीय पक्षाचे समर्थक उमेदवारीवरून संभ्रमावस्था पसरवीत असल्याचे दिसत आहे.