Mallikarjun Kharge:- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi)सत्तेवरून काढून टाकेपर्यंत मी जिवंत असेन, त्यापूर्वी मी श्वास घेणार नाही.., असे विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir)कठुआ येथे एका निवडणूक सभेत केले. हे वक्तव्य करण्यापूर्वी 83 वर्षीय नेते खरगे मंचावरच आजारी पडले होते. त्यानंतर ते उठले आणि त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
वक्तव्य करण्यापूर्वी 83 वर्षीय नेते खरगे मंचावरच आजारी पडले होते
आता खर्गे यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर (social Media)व्हायरल झाले आहे. या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah)यांनी पलटवार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, खरगे यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात किती द्वेष आहे हे दिसून येते. ते म्हणाले की, खर्गे यांनी आपल्याच नेत्यांपेक्षा आणि पक्षापेक्षाही वाईट आणि लज्जास्पद विधाने केली आहेत.