राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दिनी आज अनावरण!
बुलढाणा (Rajmata Jijau) : राजमाता जिजाऊ माँ साहेबांना जन्म देणारे त्यांचे माता-पिता म्हणजे राजे लखुजीराव जाधव व महाराणी म्हाळसा, यांचे संयुक्त शिल्प सिंदखेडराजा येथे उभारण्यात आले असून.. या अद्वितीय शिल्पाचे अनावरण रविवार १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव पर्वावर मराठा सेवा संघातर्फे जिजाऊ सृष्टी अर्थात शिवधर्मपीठ परिसरात करण्यात येणार आहे. भारतातले नव्हे तर जगातले हे (Rajmata Jijau) राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या माता-पित्यांचे पहिले शिल्प ठरणार आहे.
मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून राजे लखुजीराव जाधव व महाराणी म्हाळसा यांचे संयुक्त शिल्प तयार करण्यात आले आहे. हे शिल्प मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे बसविण्यात आले असून, त्याच्या अनावरण रविवार 12 जानेवारी रोजी (Rajmata Jijau) मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राजे लखुजीराव जाधव म्हाळसा राणी यांचे जगातील हे पहिले संयुक्त शिल्प असल्याचे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी “देशोन्नती”शी बोलताना सांगितले आहे.