नवी दिल्ली (UP Train Accident) : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भीषण रेल्वे अपघात झाला. चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचा आज भीषण अपघात (Train Accident) झाला. माहितीनुसार, दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली. ट्रेनचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले असून, (Dibrugarh Express) दिब्रुगड एक्स्प्रेसच्या एसी कोचचे मोठे नुकसान झाले आहे. गोंडा जवळील जिलाही रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. गाडी रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. लोक घाबरून ओरडू लागले आणि ट्रेन थांबताच बाहेर पळत सुटले.
मिळालेल्या माहितीनुसार, या (Train Accident) अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल 20 जण जखमी झाले आहेत. या घटनेचे कारण शोधण्यासाठी (Railway Department) रेल्वे विभागाने तपास सुरू केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. याशिवाय जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
रेल्वे माहितीनुसार, ट्रेन क्रमांक, 15904 – दिब्रुगढ एक्सप्रेस (Chandigarh-Dibrugarh) चंदीगडहून दिब्रुगढला धावते. काल रात्री 11.39 वाजता ही ट्रेन चंदीगडहून निघाली होती. आज दुपारी दोनच्या सुमारास गोंडा ते बस्ती दरम्यान झिलाही स्थानकात अचानक जोरात गाडी रुळावरून घसरली. (Train Accident) ट्रेनचे जवळपास 12 डबे रुळावरून घसरले आहेत. उत्तर प्रदेशचे (CM Yogi Adityanath) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील या रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले. याशिवाय जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही सीएमओकडून देण्यात आल्या आहेत.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath takes cognisance of the train accident in the Gonda district. He directs the officials to reach the spot immediately and expedite the relief work; gives instructions for proper treatment of the injured: CMO
(file pic) https://t.co/ggCTJKwmq3 pic.twitter.com/FxmUZqzTqH
— ANI (@ANI) July 18, 2024