तुमसर येथे येणार २८ सप्टेंबर ला जनसम्मान यात्रा
देशोन्नती वृत्तसंकलन
तुमसर (MLA Raju Karemore) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित दादा पवार या़ंची जनसम्मान यात्रा २८ सप्टेंबर रोजी तुमसर शहरात दाखल होणार आहे. यात्रेत त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महीला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, आदी राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. सदर यात्रा महाराष्ट्रातील शेती, शिक्षण, आरोग्य, कामगार, अधिकारी, कर्मचारी, शोषीत, पिडित व महीलांच्या उत्थानासाठी व त्याचे उज्ज्वल भविष्य प्रथती पथावर नेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
सभेत प़ंचविस हजार नागरीकांची उपस्थिती राहणार असल्याची पत्र परिषदेत माहिती
महाराष्ट्रतील तमाम महीलांना माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत १५०० रुपये प्रत्येकाच्या खात्यात सम्मान राशी जमा करण्यात आली आहे. आगामी काळात सदर योजेनचे १५०० रुपयावरून ३००० रुपया पर्यंत करण्यात येणार आहे. तुमसर येथिल नेहरु मैदानांवर आयोजित सभा स्थळी जाहीर सभेत तब्बल प़ंचविस हजार नागरीकाची उपस्थीती असणार असल्याची माहिती जन सम्मान यात्रे संबधी पत्रकार परिषदेत आमदार राजु कारेमोरे यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेत माजी आमदार राजु जैन, सदाशिव ढेंगे, देवच़द ठाकरे, योगेश सिंगनजुडे, सभापती रितेश वासनिक, जि. प. सदस्य महादेव पचघरे, याशिन छवारे, प्रदिप भरणेकर, राजेश देशमुख, वासनिक, उपसरपंच दिलीप सोनवाने, नानु परमार , आदी उपस्थित होते.