मुंबई(Mumbai):- पवनार ते सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्गाची मागणी व गरज नसताना सरकार कॉन्ट्रॅक्टर (contractor) मंडळींसाठी महामार्ग बनवत असल्याचा आरोप सदस्य सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत(Legislative Councils) केला. शक्तीपीठ मार्गाला पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ मार्गाची गरज काय? 83 हजाराच्या या प्रकल्पामुळे राज्यावरील कर्ज वाढणार आहे. शक्तीपीठावर एवढेच ओएम् आहे तर प्रत्येक शक्तीपीठला प्रत्येकी 5-5 हजार रुपये द्या अशी मागणी त्यांनी केली. सदस्य सतेज पाटील यांनी लक्षवेधी द्वारे प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे ते म्हणाले.
उत्तर देताना पर्यायी मार्गावरून जायला लागतात 18 तास
या लक्षवेधी वर भाई जगताप यांनी शेतकरी (Farmer)आधीच जमिनी देऊ देऊ अल्पभूधारक झाला आहे, त्यांना आता भूमिहीन करता जय असे संताप व्यक्त केला. यावर उत्तर देताना पर्यायी मार्गावरून जायला 18 तास लागतात. शक्तीपीठ मार्ग झाला तर हे अंतर फक्त 8 तासात पूर्ण होईल असे मंत्री दादा भुसे म्हणाले. दादा भुसे यांनी जनतेच्या विरोधात जाऊन कोणताही प्रकल्प करणार नसल्याचे सांगूनही विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी वेल मधे येऊन सरकार विरोधी घोषणा दिल्या. प्रकल्प रद्द रद्द करा अश्या ते घोषणा देत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यासंदर्भात बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला. मात्र विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तब्बल 5 मिनिटे घोषणाबाजी (Sloganism)सुरू होती. अनिल परब, भाई जगताप, शशिकांत शिंदे घोषणा देण्यात आघाडीवर होते. मंत्री उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र गदारोळात त्यांचे बोलणे ऐकू आले नाही. यावरून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. शेवटी या प्रश्नाचा निकाल लागला नाही. कामकाज सुरू झाल्यानंतर या विषयावर पडदा पडला.