आमदार रवी राणा यांच्या हस्ते बक्षिस वितरण
माध्यमिकच्या विजेतेपदाची मानकरी नांदुरा शाळा
अमरावती (General Champion Shield) : अमरावती पंचायत समिती तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात जनरल चॅम्पियन व प्राथमिकचे चॅम्पियन शिल्ड नांदगाव पेठ येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेने पटकाविले. तर माध्यमिकचे चॅम्पियन शिल्ड (General Champion Shield) नांदुरा शाळेने मिळविले. विजयी चमुंना आमदार रवी राणा यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे अंजनगाव बारी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर दिनांक ९ व १० जानेवारीला आयोजन करण्यात आले होते.
बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी अंकिता लाड, अधिक्षक राजेंद्र बोकाडे, प्राचार्य विनोद मुगल, उपसरपंच अरविंद निंबरते, जगदीश अंबाडकर, बंडू डखरे, जगदीश गडवाले, सुनिल निचत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, गोपाल हटवार, मोहम्मद आरिफ यांची उपस्थिती होती.
या तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवात (General Champion Shield) बिटस्तरीय विजयी चमू व खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक विभाग सांघिक खेळात कबड्डी, खो-खो, वैयक्तिक खेळात लंगडी, ७५ मी.धावणे, लांब व उंच उडी, दोरीवरील उड्या याचा समावेश तर, माध्यमिक विभाग सांघिक खेळात कबड्डी, खो-खो, व्हाॅलीबाॅल, टेनिक्वाइड, दुहेरी, बॅडमिंटन दुहेरी, १०० x ४ रिले, वैयक्तीक खेळात १०० मी. धावणे, लांब व उंच उडी, कुस्ती, गोळा फेक, टेनिक्वाइड मुली या सांघिक व वैयक्तिक खेळाचा समावेश केला होता.
यावेळी जनरल चॅम्पियन शिल्ड स्व.आर्यन देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अश्विनी देशमुख यांनी दिले. तर प्राथमिकचे स्व. सुशिलाबाई दिक्षीत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजेंद्र दीक्षित यांनी दिले. तसेच माध्यमिकचे शिल्ड स्व.सहदेवराव मामनकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चंद्रकांत मामनकर यांनी दिले. (General Champion Shield) क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केंद्रप्रमुख, मोहन जाधव, मुख्याध्यापक रामेश्वर स्वर्गीय, संध्या राठोड, हबीब कौसर, सुनील दातीर,अरुण दुधे, उमेश उदापुरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व समितीचे प्रमुख व त्यांच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर खोडे यांनी केले. संचालन किशोर मालोकार, सचिन अवघड यांनी तर आभार संदीप बोडखे यांनी मानले.
या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख अफसर खान, मोहन जाधव, संजय कोकाटे, सुमती देखणे, स्मृती बाबरेकर, अनिल डाखोडे, नंदकुमार झाकर्डे, सुभाष सहारे, इकबाल पटेल, विनायक लकडे, मनोज खोडके, संध्या राठोड, रामेश्वर स्वर्गीय, आयेशा बेगम यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक आदींनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती क्रिडा महोत्सवाचे प्रसिद्धीप्रमुख विनायक लकडे यांनी दिली आहे.