परभणी(Parbhani) :- गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या वांगी रोडचे सार्वजनिक बांधकाम (Public works)विभागामार्फत काम सुरु करण्यात आले आहे. मात्र संथगतीने सुरु असलेले हे काम निकृष्ट मटेरियल टाकून होत असल्याची तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या जात आहेत.
स्थानिक रहिवाशांनी केली तक्रार
वांगी रोडलगतच्या भैय्यासाहेब आंबेडकर नगर, हडको, अजिंठा नगर, मखदुमपुरा, हर्ष नगर, ज्ञानेश्वर नगर, युसुफ कॉलनी, साईबाबा नगर, आंबिका नगर, सागर सरगम, वांगी गाव, देवस्थान सटवाई आदी वस्त्या रस्त्याशी जोडल्या आहेत. या रस्त्यावरुन नागरीकांची मुख्य बाजारपेठ, सरकारी दवाखाना(Government Hospital), शाळा महाविद्यालय, कब्रस्तान स्मशानभुमीकडे(Cemetery Cemetery) जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. हा रस्ता बर्याच वर्षापासून खराब असून या रस्त्यामुळे नागरीकांचे बेहाल झाले आहेत. मात्र स्थानिक रहिवाशांनी केलेल्या आंदोलने, निवेदनामुळे आता रस्त्याचे काम सुरु झाले आहे. मात्र अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. माती मिश्रित मिटल टाकले जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाविषयी शंका व्यक्त केली जात आहे. सदर कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांसह वंचित बहूजन आघाडीने केली आहे.