मानोरा(Washim):- अर्काला ते आर्णी हा राष्ट्रीय महामार्ग तयार करताना वन विभागाच्या परवानगी अभावी पंचाळा फाटा, वाई गौळ व दिग्रस हद्दीत रस्त्याचे काम थांबले होते. मात्र, वर्षभरापूर्वी हा तिढा सुटूनही काम रखडल्याने सध्या चिखलातून प्रवास करण्याची वेळ अनेक वाहन धारकावर ओढावली आहे. या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणेचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
वाहन धारकांना करावा लागतो चिखलातून प्रवास
पंचाळा फाटा ते वाईगौळ या दरम्यानच्या रस्त्याची जमीन वन विभागाच्या (Forest Department) ताब्यात आहे. याच भागातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ, अकोला ते आर्णी गेलेला आहे. दरम्यान, उर्वरित काम पूर्ण होऊनही वन विभागाची परवानगी न मिळाल्याने काही ठिकाणचे काम रखडले होते. काम सुरु करण्यात आले व सर्व रस्त्यावर मुरूम न टाकता काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे नमूद रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत बुधवारी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचून चिखल झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. दुचाकी चालक मात्र यामुळे कमालीचे त्रस्त झाले होते . दुचाकी लोटत नेऊन प्रवास करण्याची पाळी अनेकावर आल्याचे दिसून आले.
संबंधित यंत्रणेने रस्त्याच्या कामाला गती देऊन मुरूम(Murum) टाकून विनाविलंब ते पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारका मधून होत आहे.
पाऊस आला की, राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर काळ्या मातीचा चिखल तयार होतो. यात वाहन स्लीप होवून अपघात घडण्याचे प्रमाण वाढत आहे. संबंधितांनी दखल घेत समस्या सोडविण्याची मागणी वाहन धारकामधून होत आहे.