नाशिक (Nashik) :- देशाला सर्विकल (Cancer)कॅन्सरपासून मुक्त करण्यासाठी कॅन्सर पेशण्ट्स ऐड् असोसिएशने (सी.पी.ए.ए.) पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सहकार्याने रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०, रसिकलाल धारीवाल हॉस्पिटलतर्फे दि.१९, २० व २१ सप्टेंबरला ९ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम आयोजित केली आहे. सुमारे २ हजार मुलींचे लसीकरण केले जाईल.
नाशिकमध्ये आतापर्यंत ३५५० मुलींना लस देण्यात आली
आता या उपक्रमात सहभागी होणाऱ्या मुलींचे मोफत लसीकरण (Vaccination) केले जाणार आहे. गर्भाशयमुख कॅन्सर हा ह्युमन पॅपीलोमा (Human papilloma) या व्हायरस मुळे होतो. मात्र हा एकमेव कॅन्सर आहे, ज्याचे लसीकरण शक्य आहे. या गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर एचपीव्ही लसीच्या साह्याने आळा घातला जाऊ शकतो. पत्रकार परिषदेत डॉ.संगिता लोढा, सतिश बोरा आणि जे. सी.भंडारी यांनी अशी माहिती दिली. याविषयी जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सीपीएए टीमच्या संचालिका डॉ. नूपुर खरे यांच्या सहकार्यातून नाशिकमध्ये सिडको परिसर तसेच पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर, सटाणा येथे हा लसीकरण उपक्रम राबवण्यात येणार आहे. यावेळी २००० मुलींचे लसीकरण केले जाईल. त्यापैकी ७०० मुली आदिवासी भागातील आहेत. शासकीय कन्या विद्यालय, कर्मवीर भाऊसाहेब माध्यमिक विद्यालय सिडको व अरिहंत हॉस्पिटलमधे रजिस्ट्रेशन केलेल्या मुलींचे लसीकरण होणार आहे, मुलीचे नाव, वय, जन्मतारीख, आधारकार्ड, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड या गोष्टींची नोंद करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी ९८५०८९८७५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
रोटरी क्लब, धारीवाल हॉस्पिटलची मोहीम
रसिकलाल धारिवाल हॉस्पिटलच्या वतीने शिबिराच्या उदघाटनप्रसंगी मुंबईचे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सी.बी. छाजेड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे अध्यक्ष राजिंदर खुराना व सचिव वीरेंद्र पात्रिकर, लसीकरण मोहीम प्रमुख रोटे. डॉ.संगीता लोढा, आरएमडी हॉस्पीटलचे अध्यक्ष नंदलाल पारख, सचिव सतीश बोरा, सहसचिव डॉ. सुनील बाफना आदी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत. पुढील महिन्यात यवतमाळ व अमरावती येथे सीपीएएच्या सहकार्याने रोटरीतर्फे अशीच लसीकरण मोहीम होईल.