परभणी(Parbhani) :- ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुकीत राखीव प्रर्वगातुन निवडुण आलेल्या व अध्याप जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केलेल्या सदस्यांनी बुधवार १० जुलै पर्यंत प्रमाणपत्र सादर न केल्यास पुर्वलक्षी प्रभावाने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे.
वैधता प्रमाणपत्र दाखल करणे आनिवार्य
जिल्ह्यात जानेवारी २०२१, ऑगस्ट, सप्टेंबर व डिसेंबर २०२२ मध्ये एकुण ६९९ ग्रामपंचायतींची निवडणुक पार पडली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १० (१) (अ) नुसार राखीव प्रर्वगातुन निवडणुन आलेल्या सदस्यांनी निवडणुन आल्याच्या दिनांकापासून १२ महिण्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र (Certificate of Validity)दाखल करणे आनिवार्य आहे. त्यानुसार बुधवार १० जुलै पुर्वी ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा सदस्यत्व अनर्ह करण्यात येईल.