परभणी/सेलू (Parbhani):- तालुक्यातील वालूर येथे सध्या सुरू असलेली पाथरी आगाराची मुक्कामी बस (Bus)बंद करण्याचे षडयंत्र पाथरी आगारा कडून करण्यात येत आहे. ही मुक्कामी बस गैरसोयीचे कारण पुढे करून पाथरी आगाराकडून बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाथरी आगाराकडून बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली
यासंदर्भात पाथरीचे आगार व्यवस्थापक यांनी १९ जुलै २०२४ रोजी जावक क्रमांक २४/१२९३ अन्वये वालुरचे सरपंच यांना लेखी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पाथरी आगाराची बस वालूर येथे मुक्कामासाठी असते. सदरील नियताच्या चालक आणि वाहक यांना रात्री झोपण्यासाठी व्यवस्था, पिण्यासाठी पाणी व सकाळी स्वच्छालयासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अर्थात या उपरोक्त सुविधा वालूर ग्रामपंचायत कडून देण्यात आल्या नाही तर ही मुक्कामी बस बंद करण्याच्या चाललेल्या हालचाली वाहक व चालक यांच्या चर्चेतून प्रवाशांना कळाल्या आहेत. म्हणून ही बस बंद करण्याचे पाथरी आगाराचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान सेलु तालुक्यात वालूर सर्वात मोठे गाव म्हणून वालुर ओळखले जाते. तेथील प्रवाशांकडून पाथरी आगाराला मिळणारे उत्पन्नही मोठे आहे.
वालुर गावाचा रस्त्याचा प्रश्नही डांबरीकरणामुळे दूर झाला आहे
विशेष म्हणजे वालूर येथे १९८० म्हणजे ४४ वर्षापासून कोव्हिडचा(covid) काळ वगळला तर अविरतपणे मुक्कामी बस सुरू आहे. वालुर गावाचा रस्त्याचा प्रश्नही डांबरीकरणामुळे दूर झाला आहे. पाथरी आगाराने वाहक, चालका करिता मागणी केलेल्या सुविधा रास्ता आहेत.परंतु त्यासाठी थेट बस बंद करण्याच्या हालचाली अत्यंत चुकीच्या आहेत. किरकोळ कारणावरून सध्या बस नियोजित बसस्थानकात न उभ्या करता झिरो फाट्यावर उभ्या करण्यात येत आहेत. एकीकडे महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मोफत (Free)आणि सवलतीत सेवा द्यायची आणि बस मात्र दोन किमी लांब झिरो फाट्यावर थांबून रिक्षाचा भुर्दंड करावयाचा हे तात्काळ बंद करून बस पुर्ववत बसस्थानकात पाठविण्याची व्यवस्था करावी यासाठी ग्रामपंचायत आणि आगार प्रमुख यांनी वाहक, चालकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाणीव करून घेत पोलीस, ग्रामपंचायत उभयतात मध्यस्थी करून हा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी प्रवाशाकडून करण्यात येत आहे.