चिखली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Vanchit Bahujan Aghadi) : आरक्षण बचाव यात्रेच्या सभेचे आयोजन दिनांक ६ ऑगस्ट रोज मंगळवारी ठीक.१२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर करण्यात आलेली आहे या सभेला सर्व आरक्षण धारी बहुजन समाजाने उपस्थित राहावे असे आव्हान (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय धुरंधर तथा सर्व पदाधिकारी चिखली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सभेमध्ये बहुजन समाजाच्या वतीने तथा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन युवक आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्वत सभा माथाडी कामगार डॉक्टर वकील शिक्षक पेन्शनदारी असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. आरक्षण बचाव यात्रेच्या महत्त्वाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुढील मुद्दे असणार आहेत ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे. एससी एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे .एससी एसटी प्रमाणेओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे.
एससी एसटी ओबीसीला पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे. १०० ओबीसीचे आमदार निवडून आणणे. 55 लाख कुणबी बनावट प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी. या प्रमुख उद्देशासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या (Vanchit Bahujan Aghadi) यात्रेला ओबीसी राजकीय पक्षांनी संघटनांनी पाठिंबा देऊन सर्व यात्रेत सामील झालेले आहेत तसेच ओबीसी व मुस्लिम समाजासह दलित आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहे तरी दिनांक ६ ऑगस्ट रोजी वार मंगळवार ठीक १२.३० वाजता चिखली येथे आरक्षण बचाव यात्रेला हजाराच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंधर तथा सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.