हिंगोली (Prakash Thorat) : शेवटच्या चेंडूवर षटकार मारत काँग्रेसचे नेते प्रकाश थोरात (Prakash Thorat) यांनी वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारी मिळविली. मंगळवारी त्यांनी पक्षाचे जिल्हा प्रभारी डॉ.बी.डी.चव्हाण व विनोद नाईक यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेस पक्षाचे युवानेते प्रकाश दत्तराव थोरात (Prakash Thorat) हे प्रारंभी पासून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत होते. त्यांच्या काँग्रेस प्रवेशावरच प्रश्न उपस्थित करीत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी त्यांना मोठा विरोध केला होता. हिंगोलीत येणार्या काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकांपासून ते मुंबईतील टिळक भवनात दोन्ही गटांमध्ये झालेले वाद जिल्ह्यातील काँग्रेसच्या अस्तित्वाला मूठमाती देणारे ठरले. प्रकाश थोरात व भाऊराव पाटील गोरेगावकर या दोन नेत्यांच्या ओढाताणीत कंटाळलेल्या पक्षश्रेष्ठींनी हिंगोलीची जागाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून दिली. यानंतर प्रकाश थोरात अपक्ष निवडणूक लढवितील अशी चर्चा होतीच.दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी तर्फे हिंगोलीतील माजी नगरसेवक जावेदराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २५ उमेदवारांच्या यादीत जावेदराज यांचे नावही होते; परंतु मंगळवारी अचानक (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी प्रकाश थोरात यांना मिळाल्याचे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले. दुपारी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी व लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार डॉ.बी.डी.चव्हाण यांच्यासहीत पक्षाच्या एबी फॉर्मसहीत प्रकाश थोरात यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. प्रकाश थोरात (Prakash Thorat) हे मागील दोन वर्षांपासून हिंगोली विधानसभेची तयारी करीत आहेत. अशात त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळाल्याने आमदार पदावर त्यांचा दावा आणखी मजबूत झाला आहे.
खरा उमेदवार कोण, उद्या निर्णय…
जावेदराज व प्रकाश थोरात (Prakash Thorat) या दोघांच्या उमेदवारी अर्जासोबत (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारीचे पत्र आहे. यापैकी खरा उमेदवार कोण, हे बुधवारी होणार्या छानणी अंती ठरणार आहे.