‘वंचित’ने डावलले पहिल्या यादीत लातूरला!
लातूर (Latur Assembly Constituency) : ज्या लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) इच्छुक उमेदवारीवरुन ढोलताशे वाजले अन् फटाके फोडले, त्याच (Latur Assembly Constituency) लातूरच्या विधानसभा मतदारसंघात ‘वंचित’ने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा हा ‘विनोद’ लातूरकरांच्या जिव्हारी लागला आहे.
निवडणूक लोकसभेची असो की, विधानसभेची. राज्यातल्या प्रमुख केंद्रांपैकी लातूर हे राजकीय केंद्र वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. लोकसभेच्या निवडणुकी वेळी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी लातूर येथे येऊन एल्गार केला होता. त्यावेळी लोकसभेला उमेदवारीही जाहीर करून लोकसभा लढली गेली. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी लातूरमध्ये दोन वेळा दौरा करून दलित ओबीसी बहुजन वर्गाच्या एकजुटीसाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली.
त्यातूनच एका सामाजिक संघटनेचा नेता ॲड. बाळासाहेब आंबेडकर (Adv. Balasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाला. त्यावेळी लातूरमध्ये विद्यमान आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख या बलाढ्य काँग्रेस नेतृत्त्वाच्या विरोधात एक लढाऊ स्पर्धक तयार झाला, अशी चर्चा सुरू झाली. कदाचित (Latur Assembly Constituency) विधानसभा निवडणुकीत या उमेदवाराच्या नावाची घोषणाही वंचित बहुजन आघाडीचे नेते करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्या ठिकाणी (Vanchit Bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीने शनिवारी जी पहिली यादी जाहीर केली. त्या यादीत लातूर विधानसभा मतदारसंघाचे नावच नसल्याने लातूरसाठी वंचितचे प्राधान्य कितव्या क्रमांकावर आहे, याचीच चर्चा अधिक सुरू झाली. ‘वंचित’ने लातूरच्या उमेदवारीवर अधिक ‘लक्ष’ न दिल्याने हे ‘लक्ष्य’ मागे पडले असावे अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
हे आहेत ११ मतदारसंघ
वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) शनिवारी जाहीर केलेल्या अकरा जागांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद पूर्व, नांदेड दक्षिण, लोहा या तीन मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण-पश्चिम, साकोली, शेवगाव व खानापूर या मतदारसंघाचा समावेश आहे.