परभणी (Parbhani):- शहर महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी गुरुवार ३० जानेवारी रोजी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांना भेटी देवून आवश्यक सूचना दिल्या.
आयुक्तांनी केली पाहणी
देशमुख हॉटेल परिसरातील रस्ता व नाली बांधकामाची पाहणी करत नागरीकांशी संवाद साधला. त्याचबरोबर मनपाचे (Municipality) जायकवाडी येथील रुग्णालय, राजगोपालाचारी उद्यान यांची पाहणी करत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अभियंता वसीम पठाण, सुधीरसिंह टेहरा, पवन देशमुख, पंकज देशमुख यांची उपस्थिती होती.




