तीन दिवसात समस्या निकाली काढा अन्यथा, अभियंत्याच्या खुर्च्या बांधून जिल्हाकचेरीवर नेणार
अमरावती (Amravati Hospital) : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन ) येथे असलेल्या विविध समस्यांनी रुग्ण त्रस्त आहेत. यामध्ये विविध विभागातील छताची गळती, विद्युत उपकरणे, परिसरातील स्ट्रीट लाईट आदींची अवस्था वाईट झाली आहे. रुग्णालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अजूनही यावर गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. असा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक दिली. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने प्रहार पदाधिकारी संतप्त झाले. तीन दिवसात कारवाई करण्यात यावी. अन्यथा मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या खुर्च्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर फरकटत नेण्यात येईल. असा इशारा निवेदनातून यावेळी देण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालय (Amravati Hospital) येथे मागील अनेक महिन्यांपासून छत गळती, विद्युत उपकरणे, स्ट्रीट लाईट आदी दुरुस्ती करा. प्रहारचे बांधकाम विभागावर धडकरुग्णालयातील रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये शस्त्रक्रिया विभाग, यासह अन्य इमारतीमध्ये छत गळती, तसेच अनेक वार्ड मधील विद्युत उपकरणे, पंखे बंद असल्याने रुग्णांचे अत्यंत हाल होत आहे. तसेच रुग्णांसाठी असलेली लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. वॉर्ड क्रमांक ७ जवळील जनरेटर बंद आहे. त्यामुळे यावर चालणारी उपकरणे बंद आहे. यावेळी रुग्ण दगावल्यास याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार असल्याचे प्रहारचे म्हणणे आहे.
छत गळती, विद्युत उपकरणे, स्ट्रीट लाईट आदी दुरुस्ती करा. प्रहारचे बांधकाम विभागावर धडक
तसेच पावसाचे पाणी आपत्कालीन विभागासमोर साचत राहते. त्यामुळे (Amravati Hospital) रुग्णालयात दुर्गंधी पसरते. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालयातील विविध समस्या तत्काळ निकाली काढण्यात याव्यात. अन्यथा प्रहार स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, महानगर प्रमुख बंटी रामटेके, संपर्क प्रमुख गोलू पाटील, नितीन मोहोड, कृषभ मोहोड, शेषराव धुळे, कुणाल खंडारे, अजय तायडे आदी उपस्थित होते.