परभणी (Parbhani):- शहरातील ज्या प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ते रस्ते इतर विभागाकडे वर्ग झाले आहेत. महापालिकेकडे असलेल्या रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर असून ही कामे लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती शहर महापालिकेकडून देण्यात आली आहे.
कृषी सारथी कॉलनी येथील रस्त्यांची कामे प्रगती पथावर
महापालिकेंतर्गत महावितरण कार्यालय ते स्त्री रुग्णालय(Women’s Hospital), अमरधाम स्मशानभुमी, महात्मा फुले पुतळा ते डॉ. साने दवाखाना, गंगाखेड रोड ते शांतिनिकेतन कॉलनी ते सातसय्यद दर्गा, गंगापुत्र कॉलनी ते स्त्री रुग्णालय, कृषी सारथी कॉलनी येथील रस्त्यांची कामे प्रगती पथावर आहेत. त्याच प्रमाणे वसमत रोड ते आकाशवाणी, हडको समाज मंदीर ते अजिंठा नगर, सहारा कॉलनी, विसावा कॉर्नर, गुजरी बाजार आदी ठिकाणच्या रस्त्यांची व नाल्यांची कामे मनपा निधीमधून प्रगतीपथावर आहेत. वसमत रोडची दुरावस्था झाली असून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे (National Highway Authority) आहे. सदर रस्त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.