वरोरा (Varora Police) : आज सकाळी साडेसात वाजता आपल्या मित्रांसह मारडा येथील डॅमवर पोहण्यासाठी गेलेला (School children) मानव अविनाश राऊत वय १५ वर्षे हा शाळकरी मुलगा पोहताना डोहात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सदर मृतक मुलगा शहरातील शनीमंदिर जवळ राहत असून तो लोकमान्य विद्यालयाचा विद्यार्थी होता.आज सकाळी आपल्या जवळच्या पाच ते सहा मित्रासोबत सायकलने नदीवर पोहायला गेला होता व तो पोहताना मित्रासमक्ष बुडाला लगेच बाकी सर्व मुलं घराकडे परत आले.
आल्यावर त्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना सांगितले असल्याचे समजते. (Varora Police) वरोरा पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले. सकाळपासून पोलिसांनी मुलाचा शोध घेतला मात्र त्याचा दिवसभर शोध लागला नव्हता. पाच वाजता नदीच्या काठाला त्याचा मृत्यूदेह आढळला. सदर मृतदेह मारेगाव हद्दीत मिळाल्याने (Maregaon Police) मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी सुरू असून मृतदेह शवविच्छेदना करीता मरेगाव येथील (Varora Hospital) ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.