वसमत/हिंगोली (Vasmat Crime) : वसमत शहरातील (vasmat city) कौठा रोड भागात अवैधरित्या गांजाची विक्री करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १८ मे रोजी पकडले. त्याच्याकडुन १२ हजार रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vasmat Crime) स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु यांच्या पथकाने १८ मे रोजी (Vasmat Police) वसमत शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली. वसमत शहरातील कौठा रोड भागात शेख वहीद शेख जावेद हा (Ganja seized) अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करत आहे.
अशी माहिती मिळाल्यावरून स्थागुशाच्या (Vasmat Police) पोलीस पथकाने पंचासह मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी कौठा रोड वसमत शहर येथे शेख वहीद यांचे घरी गेले असता तो मिळुन आला. पोलीस पथकाला त्याचे ताब्यात विक्री करीता बाळगुन असलेला व शासनाने प्रतिबंधीत केलेला अमली पदार्थ गांजा ज्याचे वजन ४८० ग्रॅ. किंमत १२ हजार रुपये असा मुद्देमाल मिळुन आला. त्यावरून पोस्टे (vasmat city) वसमत शहर येथे एनडीपीएस प्रमाणे सपोनि राजेश मलपिलु यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, (vasmat Crime) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, विठठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन व तुषार ठाकरे यांनी केली आहे.