अवैध व्यवसायिकांची भागमभाग
छापासत्राने कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत खळबळ
वसमत (Vasmat Crime) : वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासह अनेक पथकांनी एकाचवेळी अचानक अवैध व्यवसायांच्या विविध ठिकाणावर हमला केला पोलिसांचे अनेक पथक कुरुंदा भागात दाखल झाल्याची बातमी पसरताच अवैध व्यवसायिकांची भागमभाग झाली आपापले अड्डे बंद करून अवैध व्यवसायिक भूमिगत झाले काहीजण पोलिसांच्या तावडीत सापडले. अचानक झालेल्या या कारवाईने (Vasmat Crime) कुरुंदा पोलिसठाणे हद्दीत चांगलीच खळबळ उडाली आजच्या कारवाईची वसमत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे पोलीस अधीक्षकांनी कुरुंदा परिसरात सुरू असलेल्या अवैधधंद्या विरोधात मोहीम हाती घेतल्याचे चित्र या कारवाईने पहावयास मिळाले.
अवैध व्यवसायाविरोधात पोलीस अधीक्षकांनी कडक भूमिका घेतलेली असताना व जिल्हाभरात छापा सत्र सुरू असताना कुरुंदा परिसरात मात्र अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाल्यासारखे वातावरण होते यासंदर्भात देशोन्नतीने शुक्रवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते शुक्रवारी अचानक कुरुंदापरिसरात पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, डीवायएसपी कार्यालयाचे पथक व इतर पथकांचे आगमन झाले. सर्वांनी एकाच वेळी कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणांवर छापे मारले मात्र सावध झालेले अवैध व्यवसायिकांनी पथक येण्याच्या अगोदरच आपला गाशा गुंडाळून भूमिगत होण्यात धन्यता मानली होती. त्यामुळे जुगाराचे मुख्यअड्डे, मटका चालकांच्या बुकी व मुख्यगुटखा विक्रेते पोलीस पथकांच्या तावडीत सापडू शकले नाही.
कुरुंदा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेजवळील मटक्याचा अड्डा,जुगाराचा अड्डा, चिठ्ठ्यावर चालणारा मटका आदी ठिकाणी पथकाने शोधून पिंजून काढली
कुरुंदा, गिरगाव ,शिरळी ,बागल पारडी ,चोंडी ,गिरगाव येथील कॅनलशेजारील शेतातील जुगाराचा मुख्यअड्डा आदी भागातहीपथकाने छापा सूत्र सुरू केले होते
पथक आल्याची बातमी वाऱ्यासारखी कुरुंदा परिसरात पसरल्याने मुख्य अवैधव्यवसायिक भूमिगत झाले होते. तरीही पोलीस पथकांनी अवैध व्यवसायिकांच्या मुख्य अड्ड्यांवर जाऊन धडक दिली त्यामुळे चोरीछुपे नाहीतर खुल्या प्रमाणात कुरुंदा हद्दीत अवैध व्यवसाय चालतात हे स्पष्ट झाले आहे पोलीस पथक प्रत्येक अड्ड्यावर प्रत्यक्ष पोहोचल्याने कुरुंद्यातील अड्डे पोलीस पथकाला माहित झाले आहेत.
त्यामुळे आगामी काळात पथक या अड्ड्यावर छापे मारणार यात शंका राहिलेली नाही आज जरी सुटले असले तरी भविष्यात कुरुंदाभागातील अवैध व्यावसायिकांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची नजर राहणार यात हे आजच्या छात्राने स्पष्ट झाले आहेत. एकाच वेळी अनेक पथकांचे छापा सत्र झाल्याने आजची कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसायअधीक्षकांच्या रडारवर आहेत. हे आज स्पष्ट झाली आहे आजच्या कारवाईने आजच्या कारवाईने कुरुंदा पोलीस ठाणेदाराने सावध होण्याची गरज आहे अन्यथा हॅट्रिकची विकेट होण्याचा मान कुरुंद्यायला मिळेल यात शंका नाही.
पोलीस अधीक्षकांच्या कठोर कारवाया सुरू असताना व कडक सूचना असताना कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत एवढ्या खुलेआम पद्धतीने अवैध व्यवसाय चालू ठेवण्याची हिम्मत कोणाच्या जीवावर झाली याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे. कुरुंदा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ भर वस्तीत जुगारअड्डा सुरू आहे कन्याशाळेला अवैध व्यवसायिकांचा गराडा आहे चिठ्ठ्याचा मटका सुरू आहे. गिरगाव येथील कॅनल शेजारील शेतात जुगार अड्डा सुरू आहे चोंडी शिरळी भागात मटक्याने धुमाकूळ घातला आहे तसेच गुटख्याचा मुख्य व्यवसाय कुरुंदा येथून सुरू आहे.
कुरुंदा पोलीस या प्रकार विरोधात गांभीर्याने पाहत नाहीत टेक्निकल केसेस करून कारवाया सुरू असल्याचे दाखवतात वरिष्ठापर्यंत कुरुंदा भागातील कारभाराची सत्य माहिती जात नसल्याने आजपर्यंत हा सर्व खेळ सुरू होता. पोलीस अधीक्षकांच्या आजच्या कारवाईमुळे कुरुंदा भागातील अवैध व्यवसायिकांच्या व त्यांच्या पाठीराख्यांच्या उरात धडकी भरली आहे. पोलीस अधीक्षक ऍक्शन मोड मध्ये असताना कुरुंदा भागात झालेली आजची कारवाई कुरुंदा ठाणेदारांसाठी धोक्याची घंटा आहे तिसऱ्या विकेटसाठी कुरुंदा रडारवर असल्याने आगामी काळात त्यांना चोरीछुपेच्या नावावरील हा खेळ बंद करावा लागणार आहे.
शुक्रवारच्या छापासत्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोकाई सहकारी साखर कारखाना रस्त्यावरील गायरान जागेत झन्नामन्ना (Vasmat Crime) जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून 9900 चा ऐवज जप्त केला आणि विश्वास रमेशराव बागल, रामदास खंडोजी पतंगे ,गजानन दशरथ पतंगे ,विष्णू कोंडवा डुकरे ,रवी केशव मगरे सर्व राहणार बागल पारडी या पाच जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. टोकाई पाठीजवळ अवैधदारू विक्री करणाऱ्या एका जणास पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे यासह इतर कारवाया झाल्या आहेत.