सीसीटीव्ही मध्ये आरोपी अडकल्याने ओळख पटवणे झाले सोपे
वसमत (Vasmat Crime ) : वसमत येथे कारखाना रोडवरील सेतू सुविधा केंद्र चालकाला दुकानात घुसून मारहाण केल्याची व तोडफोड केल्याची घटना नऊ फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणात 25 जनाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील चार जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Setu Kendra) सेतू सुविधा केंद्र चालकाकडे जमावाने मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने यात (Vasmat Crime) मारहाण करणारे स्पष्ट ओळखले जात असल्याने पोलिसांना आरोपीची धरपकड करण्यास सोपे जात आहे.
वसमत येथे साखर कारखाना रोडवर नऊ फेब्रुवारी रोजी तुंबळ हाणामारी झाली होती. मोटरसायकल वरून कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली होती. यावेळी पोलिसांनाही मारहाण व धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे वसमत मध्ये गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी वाढीव बंदोबस्त पाठवून वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली होती.
या (Vasmat Crime) घटनेचा वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहेत यात मारहाण प्रकरणातील वाखारी येथील नऊ आरोपींना घटनेनंतर लगेच अटक झाली होती. या आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्याने सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेनंतर जमावाने कारखाना रोडवरील सचिन पत्रकर यांच्या सेतूसुविधा केंद्र चालक सचिन पत्रकर व त्यांच्या आईला मारहाण केली होती. केंद्र चालकाला सीसीटीव्ही फुटेज मागण्याच्या कारणावरून जमावाने नाहक गोंधळ घालून मारहाण करून तोडफोड केली होती. या प्रकरणात सचिन पत्रकार यांच्या तक्रारीवरून 25 जना विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील चार आरोपीना शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उर्वरित आरोपींचा शोध वसमत पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेत (Setu Kendra) सेतू सुविधा केंद्र चालकाला मारहाण करण्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. केंद्र चालकाने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. त्यामुळे पोलिसांना जमावातील सर्व आरोपीची ओळख पटवणे सोपे झाले आहे. सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर पोलीस पोलिसांनी आरोपीची यादी तयार केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. उर्वरित आरोपी लवकरच सापडतील असे वसमत शहर पोलिसांनी सांगितले आहे.
या (Vasmat Crime) घटनेत जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातही 25 आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तर ॲट्रॉसिटी चा एक गुन्हाही दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत त्यांचाही शोध वसमत शहर पोलीस घेत आहेत.
सेतू सुविधा केंद्र (Setu Kendra) चालकाला मारहाण केल्याच्या घटनेतील चौघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. पोलीस पाटील दरम्यान इतर आरोपींचाही तपास लागेल अशी शक्यता आहे. शहरात तणाव निर्माण करणाऱ्या या घटनेत आरोपींना पाठीशी घालण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत असल्याने पोलीसही त्रस्त झाले असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सर्व आरोपींना शोधून अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.