वसमत ग्रामीण हद्दीतील कमलपुष्प बियरबारची घटना
वसमत/हिंगोली (Vasmat Crime) : वसमत तालुक्यातील माळवटा परिसरात असलेल्या कमलपुष्प बियरबार हॉटेलवर चोरट्याने शनिवारी रात्री डल्ला मारला यात आर सी व मॅकडॉल नंबरवन या विदेशी दारूची ११ खोके लंपास केले ९० हजार २४० रुपयाचा दारूचा साठा चोरीला गेल्याची तक्रार (Vasmat Crime) वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे चोरट्यांनी दारूचे खोक्यावर डल्ला मारल्याने आता या चोरीचा शोध पोलीस कसे लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसमत तालुक्यातील (Vasmat Crime) नांदेड रोडवरील माळवटा पाटीवर हॉटेल कमलपुष्प ही बियरबार आहे बिअरबारचे शटरचे लॉक चोरट्याने शनिवारी मध्यरात्री नंतर तोडले व बियरबार मध्ये प्रवेश केला बियरबार मधील रॉयलस्टॅग कंपनीच्या विदेशी दारूचे चार खोके किंमत ३६ हजार ४८० रुपये व मॅकडॉल नंब वन या विदेशीदारूचे सात खोके किंमत ५३ हजार ७६० रुपये असा नव्वद हजार २४० रुपयाचा दारूसाठा चोरट्याने लंपास केला आहे याप्रकरणी हॉटेलचे मॅनेजर बालाजी जाधव यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात पुन्हा नोंदवला आहे.
घटने पोलिसात तक्रार आल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास काचमांडे, पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे करत आहेत. चोरट्याने चोरून नेलेली दारू शोधण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे. दारूचे खोके चोरून नेणारे चोरटे आहेत का दारुडे आहेत याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
वसमत येथून वसमत तालुक्यातील प्रत्येक गावात दुचाकीवरून दारूची खोके खुलेआम राष्ट्रीय महामार्गाने पाठवण्याचा प्रकार अखंडितपणे सुरू आहे दिवसभर,रात्रभर व भल्या पहाटे दारूची खोक्यांची पार्सल वाहतूक दुचाकीवरून होत असते या प्रकारामुळे दारूचा महापूर वसमत तालुक्यात वाहत आहे महिला नागरिक त्रस्त आहेत मात्र या पार्सल दारूला कोणीही अडवत नाही. (Vasmat Crime) दिवसा ढवळ्या दुचाकीवरून दारूची राष्ट्रीय महामार्गाने पार्सल पुरवठादार घेऊन जात असतात पार्सल वाल्यांना कोणी अडवत नाही असा सर्वांचा समज आहे त्यामुळे चोरट्यांनी दुचाकीवरूनच दारूची खोके लंपास केली असावीत व सवयीप्रमाणे त्यांना कोणी अडवले नसावे अशी शक्यता नाकारता येत नाही. आता पोलीस या चोरीचा तपास कसे लावतात व पार्सल दारूवर लगाम असतात किंवा कसे याकडे सर्वांचे लक्ष आहे