रहदारीला अडथळा करणारे दुकानाबाहेरील शेड हटवले
वसमत (Vasmat Municipality) : वसमत नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार व (Vasmat Municipality) नगरपालिकेच्या पथकाने शहरातील रहदारीला अडथळा करणारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याचाच भाग म्हणून दुकाना बाहेर लावलेल्या झापड्या शेड काढण्याचे काम सुरू आहे.
वसमत शहरातील मुख्य रस्त्यावर रहदारीला अडथळा करणारे (Vasmat Municipality) अतिक्रमण हटवण्याचे काम मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक व नगरपालिका कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त मोहिमेतून सुरू झालेले आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या हातगाडे व अतिक्रमण काढण्यात आले आहेत. काही व्यापाऱ्यांनी व्यापारी संकुलाच्या बाहेर मोठमोठे शेड उभे करून रहदारीला अडथळा करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुकानाबाहेरील शेड काढून रस्ता व्यापलेला रस्ता मोकळा करणे व रहदारीतील अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (Vasmat Municipality) नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या विविध व्यापारी संकुलातील दुकाना बाहेर बांधण्यात आलेले शेड काढण्याचे काम सुरू आहे. रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी केले आहे.