पिस्तोल बाळगण्यातील हलगर्जीपणा भोवला
वसमत (Vasmat Police Inspector) : वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांची सोमवारी तडका फडकी करण्याची कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली त्यांच्या जागी हिंगोली जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांची वसमत येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षकांच्या पिस्तुलातून गोळीबार करून तीन जणांचा बळी घेतल्याचे प्रकरण त्यांना भोवले असल्याचे वृत्त आहे.
सोमवारी वसमत शहर (Vasmat Police Inspector) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांना पोलीस मुख्यालयात हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले त्यांच्या जागी हिंगोली जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांना वसमतचा पदभार घेण्यासाठी पाठवण्यात आले जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक वाघ यांनी वसमत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे तर पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांना जिल्हा विशेष शाखा व शहर वाहतूक शाखेचा पदभार देण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सोमवारी ही कारवाई केली त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Vasmat Police Inspector) वसमत पोलीस ठाण्याचे कर्मचारी विलास मुकाडे याने पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांचे शस्त्रागारातील पिस्तोल हस्तगत करून हिंगोलीत सासरवाडीत जाऊन पत्नी ,सासू व मेव्हण्यावर गोळीबार केला होता यात पत्नी जागेवरच ठार झाली होती तर मेव्हणा व सासू हे उपचारादरम्यान मयत झाले. तीन जणांचा बळी घेण्यासाठी पोलीस निरीक्षकांचे पिस्तोल कारणीभूत ठरले होते. या प्रकाराची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोन वेळेस वसमत येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली होती.
पोलीस निरीक्षक वाघमारे (Vasmat Police Inspector) यांचा पिस्तोल सांभाळण्यात झालेला हलगर्जीपणा त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी वसमत येथे वार्षिक तपासण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी वसमत येथे भेट दिली होती. तपासणी होऊन ते गेल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे. आता नव्याने पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक सुधीर वाघ हे वसमतच्या वाढलेल्या गुन्हेगारीवर आणि अवैध व्यवसायावर कसा वचक ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिस्तूल प्रकरण तर अंगलट आलेच शिवाय (Vasmat Police Inspector) वसमत येथे एकापाठोपाठ एक गंभीर घटना घडल्या दगडफेकीच्या दोन घटना घडल्या जातीय तणाव वाढवणाऱ्या या दोन घटनातील सर्व आरोपी अजूनही अटक झालेले नाहीत. यासह इतर गंभीर गुन्ह्याचा तपासही प्रलंबित आहे त्याचा फटका वाघमारे यांना बसल्याची चर्चा आहे. आता नवीन पोलीस निरीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वसमत येथे राजकीयलेबल लावून अधिकाऱ्यांशी संबंध वाढवायचे व त्या आडून अवैध व्यवसाय थाटायचे असा प्रकार आहे. अशा प्रवृत्तींना चार हात दूर ठेवून चोरीछुपे च्या नावावर सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात नवीन पोलिस निरीक्षकांना कडक भूमिका घ्यावी लागणार आहे.