हिंगोली (Talathi attack Case) : अवैध गौणखनिज माफीयाकडून वसमत येथे तलाठयावर करण्यात आलेल्या हल्लाचा महाराष्ट्र राज्य ग्राम महसुल अधिकारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.
वसमत तालुक्यात अवैधरित्या होणारा वाळू उपसा व वाहतुक थांबविण्यासाठी महसूल विभागाने पथके स्थापन केली आहेत. या (Talathi attack Case) पथकांकडून वसमत ते मालेगाव मार्गावर वाळूचा ट्रक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफीयांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक तलाठी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेच्या हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी व महसुल पथकावर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असुन यावर अंकुश लावण्यासाठी ठोस कारवाई करावी अशी मागणी केली.
वसमत येथील अवैध गौण खनिज उत्खनन करणारे माफियाकडून तलाठी यांच्यावर हल्ला करुन जखमी केले. या (Talathi attack Case) घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्राम महसुल अधिकारी संघाच्या वतीने निषेध निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी संघाचे गजानन रणखांब, विनोद ठाकरे, प्रियंका खडसे, एकनाथ कदम, किर्ती मसारे, रंगनाथ मेहेत्रे, प्रदिप इंगोले, राजकुमार शेळके, केशव अंभोरे, वसंत जाधव, विनोद गादेकर, संगमेश्वर सोनटक्के, अमोल गंगावणे, विनायक किन्होळकर, रामेश्वर गिरी, स्मिता सुर्यवंशी, शिल्पा कोहर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.