देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Vasmat Violence:व्हाट्सअ‍ॅपवरील वादग्रस्त पोस्टमुळे वसमतमध्ये प्रचंड तणाव
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Vasmat Violence:व्हाट्सअ‍ॅपवरील वादग्रस्त पोस्टमुळे वसमतमध्ये प्रचंड तणाव

Digital Nagpur
Last updated: 2024/12/16 at 8:25 PM
By Digital Nagpur Published December 16, 2024
Share
Vasmat Violence

जमावाकडून घर दुकानांवर दगडफेक
उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना जिवे मारण्याच्या धमक्या
बारा जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल

वसमत (Vasmat Violence) : येथे मोबाईल ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने वसमत शहरात रविवारीरात्री अचानक तनाव उद्भवला संतप्तजमावाने प्रचंड दगडफेक केली त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले वसमत शहरात तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांना ‘इथून निघून जा अन्यथा तुम्हाला जिवे मारून टाकू’ अशा धमक्या जमावाने दिल्या त्यामुळे तणावात भर पडली होती. याप्रकरणी (Vasmat Violence) वसमत शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत बारा आरोपी पैकी आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

सारांश
जमावाकडून घर दुकानांवर दगडफेक उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना जिवे मारण्याच्या धमक्या बारा जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखलपोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे तातडीने दाखल झाल्याने अनर्थ टळला

वसमत येथील मोंढा भागातील आडत व्यापारी कैलास काबरा यांनी बाजार समितीच्या व्यापार्‍यांच्या एपीएमसी वसमत या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर मुस्लिम धर्माबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली हा प्रकार शहरातील मुस्लिम समाजांला समजला. पाहता पाहता ही बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पोहोचला. त्यानंतर प्रचंड संताप व्यक्त झाला व शहरात मोठा जमाव जमला (Vasmat Violence) वसमत बाजारपेठेत मोठ्या संख्येने संतप्त जमाव जमा झाला होता. प्रचंड घोषणाबाजी दगडफेक सुरू झाली घोषणा देत जमाव शहराच्या विविध भागात फिरत होता त्या जमावाने कैलास काबरा यांच्या मोंढा परिसरातील घरावर हल्ला केला.

घरावर प्रचंड दगडफेक केली तसेच शहरातील विविध भागात दगडफेक करून दहशत निर्माण केली बंद दुकानांवर दगडफेक केली. दुकानाच्या पाट्या फोडण्याचा प्रकार झाला. कारखाना रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रकार जमावाने केला. रविवारी रात्री शहरात विविध भागातील युवकांचे टोळके रस्त्यावर उतरले होते घोषणाबाजी करून दगडफेक करत होते त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हा प्रकार पाहताच शहरातील व्यापार्‍यांनी भीतीपोटी पटापट दुकाने बंद केली दहा मिनिटात वसमतची बाजारपेठ बंद झाली.

कैलास काबरा यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेलेल्या जमावाला पांगवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे , (Vasmat Violence) वसमत शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले असता जमावाने पोलिसांवर राग व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांना ‘तुम यहासे चले जाव नही तो तुम्हारे को यहा पे मार डालेंगे’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्याने तणावात वाढ झाली.

पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवला हिंगोलीहून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे फौज फाट्यासह तातडीने वसमत येथे दाखल झाले. दहशत निर्माण करणार्‍या बेकायदा जमावावर कडक कारवाईचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. पोलिसांनी कारवाई सुरू करताच पाहता पाहता जमलेला जमाव गायब झाला. मोबाईलवर वादग्रस्त पोस्ट टाकून धर्माच्या भावना दुखावल्या बद्दल मोहम्मद हशम खान यांच्या तक्रारीवरून कैलाश काबरा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बेकायदा जमाव जमवून उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्रे यांना जीवे मारण्याचे धमकी दिल्या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या तक्रारीवरून शेख मोहसीन शेख हसन, खालीद अख्तर जमीरअहमद, शेख अरबाज शेख मेहमूद, शेखनदीम शेखमोईन, मोहम्मद शोयब मोहम्मद मकसूद, मुशरफ काजलोद्दीन फारुखी, मोहम्मद सोहेल मोहम्मद मकसूद, शेख अजीम शेख मोईन, अरबाज शेख उर्फ बब्बी, शेख जुनेद , अरफात शेख, सय्यद आवेज सय्यद खाजा यांच्या विरोधात पुन्हा नोंदवण्यात आला आहे तर पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड यांच्या तक्रारी वरून कारखाना रोडवर रस्त्यात टायर जाळून वाहतूक रोखल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वसमत पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. इतर आरोपीची धरपकड सुरू आहे. वसमत शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे तातडीने दाखल झाल्याने अनर्थ टळला

वसमत शहरात (Vasmat Violence) हजारोचा जमाव रस्त्यावर फिरत होता विविध भागातून टोळके रस्त्यावर येऊन घोषणाबाजी व दगडफेक करत होते. त्यामुळे प्रचंड दहशतीचे वातावरण होते वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍या व्यापाराच्या घरावर जमाव हल्ला चढवण्यासाठी गेला होता घरावर प्रचंड दगडफेक केली जात होती त्यामुळे संपूर्ण शहर तणावात होते. घटनेचे गांभीर्य समजतात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे तातडीने वसमत शहरात दाखल झाले त्यांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली.

पोलिसांनाही कोणाची गय करू नका कडक कारवाई करा असे आदेश दिल्याने पोलिसांनाही बळ मिळाले त्यामुळे तासाभरातच तणाव निवळण्यास मदत झाली अन्यथा गंभीर घटना घडण्याची शक्यता होती. पोलीस अधीक्षकांच्या तत्परतेमुळे व पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे वसमत मधील रविवारचा अनर्थ टळला असेच म्हणावे लागेल. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात जमाव कसा जमला त्या जमावाला कोणी चिथावणी दिली का कसे चिथावणी देणारे कोण आहेत याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: Vasmat Violence
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli: दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

Digital Nagpur Digital Nagpur March 20, 2025
Desaiganj : विकासपल्ली येथे रानटी हत्तींनी केले प्रचंड नुकसान
Ganeshotsav Festival: गणेशोत्सव शांततेत; स्वयंसेवकासह पोलिसांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
Independence Day 2025: भारताच्या इतिहासाची शौर्यगाथा; 15 ऑगस्टचे महत्त्व आणि त्याच्या निवडीमागील खरे कारण..!
NEET-UG: ‘NEET-UG’ पेपर 4 मे पूर्वी झाला LEAK..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?