वसमत (Vasmat youth suicide) : येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय तरुणाने (Vasmat Railway) रेल्वे पटरीवर आत्महत्या (youth suicide) केल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी मयताच्या पालकाच्या तक्रारीवरून दोन जनाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्रासाला कंटाळून ही आत्महत्या झाली असल्याची तक्रार देण्यात आल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयताचे नातेवाईक व पळशी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने (Vasmat Police) वसमत शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.
वसमत येथील मुडी रस्त्यावरील रेल्वे पटरीवर ७ ऑगस्ट रोजी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळला (Vasmat Railway) रेल्वेच्या धडकेने त्याचे निधन झाले होते. चैतन्य पंडित बेंडे (१९) रा.पळशी ता.वसमत असे मयताचे नाव आहे. घटनेचे वृत्त समजतात मयताचे वडील व नातेवाईक (Vasmat Police) वसमत शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले त्यांनी ही आत्महत्येचा प्रकार नसून यात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. याप्रकरणी मयताचे वडील पंडित सुदामराव बेंडे रा. पळशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नैतिक सूर्यकांत कातोरे , कमलाकर उर्फ कमलेश माधव कदम दोघे रा.वसमत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांच्या त्रासाला कंटाळून रेल्वे पटरीवर आत्महत्या (youth suicide) झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. इन्स्टाग्राम वरील अकाउंट व मेसेज वरून वाद झाल्याचे कारण यामागे असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केंद्रे पुढील तपास करत आहेत. (Vasmat Police) पोलीस तपासातच घटने मागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.