परभणी(Parbhani) :- शहरात आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकलपनेतून १ लक्ष वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. त्या विषयीची माहिती पाथरी रोडवरील रेणुका नगर येथील वृक्ष लागवड(Tree planting) प्रसंगी देण्यात आली.
परभणीत आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतुन १ लक्ष वृक्ष वाटप
दिवसेंदिवस तापमानात(Tempreture) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच दिवसेंदिवस पाऊस सुद्धा कमी पडत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्यास पाऊस होण्यास मदत होणार असून यासाठी परभणी विधानसभा मतदार संघांमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) वृक्ष लागवड व संवर्धन अभियान सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत एक लाख वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. रेणुका नगरातील कार्यक्रमात बोलतांना आ.डॉ.राहुल म्हणाले की, परभणी विधानसभा मतदारसंघात(Assembly constituencies) २० जुलै पासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियान सुरू केले आहे. या अभियानात परभणी शहर आणि मतदार संघांमध्ये विविध प्रकारची देशी वृक्षांची रोपे दिली जाणार आहेत. या झाडांमुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरण्यास देखील मदत होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. आपल्या मुलाच्या, लग्नाच्या वाढदिवसा निमित्त तसेच विविध उपक्रमानिमित्त घर, परिसर, मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करावी. त्यासाठी लागणारे वृक्ष आम्ही देणार असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, व्याख्याते प्रा.विठ्ठल कांगणे, कृउबास संचालक अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होती.