हिंगोली (Hingoli) :- जिल्ह्यात एनसीसीएफ (NCC) मार्फत खरेदी होत असलेल्या शासनाच्या सोयाबीन (Soyabean) साठ्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोयाबीन साठा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात येत आहे. तसेच किरायाने गोदामे घेऊन देखील साठवणुकीचे नियोजन केले जात आहे.
जिल्ह्यात ५३९०० मे.टन सोयाबीन साठवणुक सोयाबीन, तुर २० मे.टन. साठा साठवणुकीस अपेक्षित
३० जानेवारी अखेर जिल्ह्यात एकुण ५३ हजार ९०० मेट्रिक टन सोयाबीन साठवणुक करण्यात आली आहे. जिल्हा मार्केटींग अधिकारी व इतर खरेदी संस्थाशी चर्चा केल्यानंतर जिल्ह्यात आणखी १० हजार मेट्रिक टन सोयाबीनसाठा व १० मेट्रीक टन तूर साठा असा एकुण २० हजार मेट्रीक टन साठा खरेदी होऊन साठवणुकीस येणे अपेक्षित आहे. परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यात साठवणुकीकरीता गोदामे उपलब्ध नाहीत. त्यामुळे वखार केंद्रावर साठवणुकीसाठी जागा उपलब्धते अभावी ट्रक उभे राहत आहेत. याबाबत विविध संघटना व शेतकरी उत्पादक संस्था वारंवार जागेच्या उपलब्धतेची मागणी करीत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात म.रा. वखार महामंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांनी पत्राव्दारे जिल्ह्यातील खासगी गोदामे शासनामार्फत हमीभावाने खरेदी होत असलेला सोयाबीन व तुर साठ्याच्या साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
एकुण २० हजार मेट्रीक टन साठा खरेदी होऊन साठवणुकीस येणे अपेक्षित
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हिंगोली तालुक्यातील व्यंकटेश्वर वेअरहाऊस हिंगोली हे गोदाम अधिग्रहीत करण्यास जिल्हा पनन अधिकारी परभणी/ हिंगोली यांना मान्यता दिली आहे. पनन अधिकार्यांनी जिल्ह्यामध्ये एनसीसीएफ मार्फत होत असलेल्या सोयाबीन व तुर साठवणुकीसाठी हे गोदाम अधिग्रहीत करून साठवणुकीकरीता शेतकर्यांना अडचणी निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आहे.