हिंगोली (Hingoli) :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद(Vishwa Hindu Parishad), बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. औरंगजेबाची कबर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारी असून ती अन्यायाचे ऐतिहासिक प्रतीक आहे. त्यामुळे ती तातडीने हटवली जावी अशी सर्वच हिंदुत्ववादी संघटनाची ठाम भूमिका आहे.
औरंगजेबाची कबर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारी असून ती अन्यायाचे ऐतिहासिक प्रतीक
या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू समाजाचा एकसंघतेचा संदेश दिला जाणार असून धर्माच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे. जर का कबर हटविली नाही तर बजरंग दलाच्या (Bajrang Dal) वतीने टोकाची भूमिका घेऊन उध्वस्त करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासन, आणि शासनाला दिला आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष सावरमल अग्रवाल, विभाग धर्म प्रसारक राजेंद्र हलवाई, विभाग संयोजक कैलास श्रीनाथ, महेश बियाणी, राम हराळ, प्रदीप धडवाई, अरुण कहार, अंकुश हनवते, गणेश सोळंके, गणेश जाधव, विजय शिंदे, करण सुतारे, निखिल शिंदे, रमाकांत मिश्किन, शुभम श्रीवास, अविनाश श्रीनाथ, नागेश देवके, आदींची उपस्थिती होती.