धामणगाव बढे मध्ये रेकॉर्ड ब्रेक ‘मशाल’ ची प्रचार रॅली
धामणगाव बढे (Jayashree Shelke) : निवडणूक म्हटले की रुसवे – फुगवे ,हेवे – दावे येतात. मात्र पहिल्यांदाच या निवडणुकीत अशी कुठलीही अडकाठी दिसून येत नाहीये. बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेनेच ही निवडणूक हाती घेतल्याचा प्रत्यय येत आहे. गावा गावांमध्ये प्रचार रॅली निघते; तिथे माय माऊल्या, हक्काचे भाऊ आणि तरुणांचा प्रचारात ओसंडून वाहणारा उत्साह दिसून येत आहे.
त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दडपशाही आणि दादागिरी ला न जुमानता स्वतः मायबाप जनता प्रचारामध्ये मध्ये सामील होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने या मिळणाऱ्या प्रेमामुळे भारावून गेल्याचे उद्गार बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके (Jayashree Shelke) यांनी धामणगाव बढे येथे काढले.
धामणगाव बडे येथे मशाल चा रथ पोहोचला आणि सोबतच उमेदवार जयश्रीताई शेळके (Jayashree Shelke) या येणार म्हणून गावातील गल्ल्याबोळ्यातून बाया माणसं मुख्य रस्त्यावर जमायला सुरुवात झाली. अंधार पडला तरीही ही माणसं जागा सोडायला तयार नव्हती. जयश्रीताई शेळके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाल्या तेव्हा सुवासिनींनी औक्षण करत त्यांचे स्वागत केले. धामणगाव बढे सारख्या मोताळा तालुक्यातील मोठे गाव आणि त्यातही राजकीय दृष्ट्या सजग असलेल्या या गावात निघालेली प्रचंड रॅली आणि जनतेचा उत्साह वेगळाच माहोल तयार करून गेला. सोशल माध्यमांवर देखील धामणगाव बढे येथील रॅलीचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याचा प्रत्यय यातून येत असून आपण आजन्म या प्रेमाची ऋणी राहो अशी भावोद्गार जयश्रीताई शेळके (Jayashree Shelke) यांनी काढले.