२ जुलैला केळीवेळी येथे स्व . रामकृष्ण आढे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा
दर्यापूर (Vidarbha Award) :संपूर्ण भारतभर कबड्डी या खेळासाठी आपल्या योगदानाने प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील केळीवेळी या गावामध्ये ग्राम महार्षि म्हणून ओळखले जाणारे जून्या पिढीतील भूदान प्रणेते व लोकमान्य समाजसेवक स्व. रामकृष्ण उपाख्य जानराव नामदेव आढे (Ramakrishna Aadhe) यांचा दोन दिवसीय जन्मशताब्दी महोत्सव येत्या १ व २ जुलै दरम्यान केळीवेळी येथे संपन्न होत आहे .
या निमित्याने स्व. रामकृष्ण आढे (Ramakrishna Aadhe) यांचे कार्य स्मृति प्रित्यर्थ दिला जाणारा २०२४ या वर्षाचा (Vidarbha Award) स्मृती पुरस्कार दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , (Gadgebaba Gorakshana Sanstha) गाडगेबाबा गोरक्षण संस्था माहूली ( धांडे ) संस्थेचे संस्थापक संचालक तथा बेलोरा ( ता. दर्यापूर ) या गावचे माजी सरपंच प्रा. गजानन रामकृष्ण भारसाकळे (Prof. Gajanan Bharasakle) यांना जाहीर करण्यात आला आहे . दि. २ जुलै २०२४ या दिवशी सकाळी ९ वाजता कार्यक्रमासाठी आमंत्रित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रा. भारसाकळे यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल . पुरस्कार निवड समिती सदस्यांनी मागील महिन्यात दर्यापूर येथे गाडगेबाबा मंडळाचे कार्य व गोरक्षण परीसर या बाबत प्रत्यक्ष भेटी दरम्यान पाहणी व संबंधीतांशी वार्तालाप करून हा संक्षिप्त अहवाल स्व. आढे पुरस्कार निवड समितीकडे सादर केला .
यावर निवड समितीने प्रा. गजानन भारसाकळे यांच्या नावाची रितसर घोषणा केली . सन्मान पत्र व पाचहजार रुपये रोख असे पुरस्कार स्वरूप असलेला हा पुरस्कार प्रा. भारसाकळे आपल्या कार्यात सदैव सोबत असणाऱ्या सदस्यांसोबत स्विकारणार असल्याची माहिती आमच्या वृत्तपत्राच्या स्थानिक प्रतिनिधी यांनी दिली आहे .प्रा. गजानन भारसाकळे (Prof. Gajanan Bharasakle) यांना त्यांच्या आजवरच्या समाजसेवा कार्यासाठी विविध गणमान्य संस्थांनी पुरस्कारांनी गौरविले असून त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे के. नागोराव जयरामजी मेटकर स्मृती (Gadgebaba Gorakshana Sanstha) गाडगेबाबा समाज कार्य पुरस्कार २०१९ तथा पर्यावरण पुरस्कार २०२४ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे . हे दोन्ही पुरस्कार एकत्रित प्राप्त ते आजवर एकमेव व्यक्ती ठरल्याने ही बाब विषेश अभिनंदनीय ठरली आहे . केळीवेळी येथील स्व. रामकृष्ण उपाख्य जानराव आढे स्मृती पुरस्कार घोषणेबाबत प्रा. गजानन भारसाकळे (Prof. Gajanan Bharasakle) यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .