आ. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील बंधाऱ्याची संपूर्ण राज्यात निर्मिती
अमरावती (Vidarbha dam system) : कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होऊन त्यांना ओलीताची शेती करता यावी यासाठी नेहमी प्रयत्नरत असलेले आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांच्या संकल्पनेतून अचलपूर विधानसभा मतदारसंघात विदर्भ पद्धतीच्या बंधार्यांची निर्मिती करण्यात आली आहे. अत्यंत यशस्वी ठरलेला हा विदर्भ पद्धतीच्या बंधार्याचा प्रयोग आज एक रोल मॉडेल ठरला असून राज्य सरकारने संपूर्ण राज्यात या (Vidarbha dam system) प्रकारच्या बंधार्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण मतदारसंघ हा ओलीताखाली असावा, कुठलाही शेतकरी हा कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहू नये याकरिता आमदार बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या असून त्यांच्याच संकल्पनेतून उदयास आलेला विदर्भ पद्धतीचा बंधारा हा एक अत्यंत यशस्वी प्रयोग ठरला आहे. सध्या ज्या भागात पाणी टंचाई उद्भवत आहे किंवा भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे तसेच ज्या ठिकाणी कॅनल ने पाणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी कमी खर्चात, कमी मेंटेनेस मध्ये आणि भरपूर पाणी साठा उपलब्ध करून देणाऱ्या विदर्भ पद्धतीचा बंधारे बांधण्याची नियोजन आ. बच्चू कडू यांनी केले होते . अचलपूर मतदार संघातील कुरळ पूर्णा येथील पूर्णा नदीवर सर्वप्रथम (MLA Bachu Kadu) आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. 2019- 2020 या आर्थिक वर्षात एन एच ए आय च्या माध्यमातून हा बंधारा अंदाजे साडे तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. बंधार्याची संपूर्ण डिझाईन ही बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील असून पूर्णत्वास आलेल्या या बंधार्यास त्यांनी (Vidarbha dam system) विदर्भ पद्धतीचा बंधारा असे नाव दिले.
या बंधार्याची उपयोगिता सिद्ध झाली असून आज बंधाऱ्यामुळे कमीत कमी दोन किलोमीटर पर्यंत पाणी थांबून पाण्याची पातळी खोल गेलेल्या गावातील पाण्याची पातळी वाढली आहे. विदर्भ पद्धतीच्या बंधार्याचा यशस्वी झालेला प्रयोग व त्यापासून होणारे फायदे लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने रोल मॉडेल ठरलेल्या या (Vidarbha dam system) बंधार्यांची संपूर्ण राज्यात निर्मिती करण्याचा निर्णय घेत त्या प्रकारचे बंधारे बांधण्यात येत आहे.
मतदारसंघात अनेक ठिकाणी बांधले बंधारे
विदर्भ पद्धतीच्या बंधाऱ्यांचा (Vidarbha dam system) प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसताच आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघातील अचलपूर व चांदूरबाजार या दोन तालुक्यातील देऊरवाडा ,खांबोरा ,शिरजगाव कसबा, बेलोरा ,बेसखेडा, बोराळा, चिंचोली , वाठोंडा ब्राह्मणवाडा थडी या ठिकाणी असलेल्या नद्यांवर मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विदर्भ पद्धतीचा बंधारा बांधून शेतकऱ्यांना शेतीच्या ओलितासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. मतदारसंघात 53.72 कोटीची 36 कामे मंजूर असून 11 कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली आहे. यामुळे 904 सघमी पाणीसाठा निर्माण होऊन 350 हेक्टर शेती सिंचनाखाली आली असल्याची माहिती (MLA Bachu Kadu) आमदार बच्चू कडू यांनी दिली.
देऊरवाडा तीर्थक्षेत्राचे पालटले रूप
देऊरवाडा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून येथून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठी विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर आहे. या नदीवर आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विदर्भ पद्धतीचा बंधारा तब्बल एक कोटी 65 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आला. सदर बंधाऱ्यामुळे तीर्थक्षेत्राचे रुपडे पालटले असून रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराला पंढरपूरचे रूप प्राप्त झाले आहे. या सोबतच परिसरातील काजळी, देऊरवाडा व अन्य गावातील पाण्याची पातळी वाढून पाण्याचे दुर्भिक्ष कमी झाले आहे. परिणामी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी (MLA Bachu Kadu) आमदार बच्चू कडू यांचे आभार मानले आहे.
पुढील ५० वर्षाच्या नियोजनाचा भाग -आ. कडू आपला संपूर्ण मतदारसंघ हा ओलीताखाली असावा तसेच कुठलाही शेतकरी हा कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहू नये याकरिता पुढील पन्नास वर्षाच्या नियोजनाचा एक भाग म्हणून मतदारसंघात विविध ठिकाणी विदर्भ पद्धतीचे बंधारे बांधून सिंचन क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .यासाठी गेल्या पाच वर्षात करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून या यशस्वी प्रयोगामुळे मोठा पाणीसाठा निर्माण होऊन हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. आर्थिक दृष्टचक्रात सापडलेला बळीराजाला थोडे आर्थिक स्थर्य प्राप्त व्हावे या प् प्रामाणिक भूमिकेतून आपले कार्य अव्यातपणे सुरू असल्याची प्रतिक्रिया (Vidarbha dam system) विदर्भ पद्धतीच्या बंधाऱ्याचे जनक (MLA Bachu Kadu) आमदार बच्चू कडू यांनी दिली.