नवीन सरकारपुढेही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ठेवणार :- अॅड. वामनराव चटप यांची माहिती
नागपूर- (Nagpur) सध्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असून जून महिन्यात केंद्रामध्ये नवीन सरकार स्थापन होणार (A new government will be formed ) आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांच्यापुढे स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी (Demand for independent Vidarbha state) केली जाईल. एवढेच नव्हे तर या मागणीसाठी आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, ( There will be intense agitation,) अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे (Vidarbha State Movement Committee) नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप (Former MLA Adv. Vamanrao Chatap) यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या निवडणुकीत केंद्रात बदल होईल (There will be a change in the center in this election) असे देशात सध्या वातावरण आहे, असे सांगून अॅड. चटप म्हणाले, भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) विदर्भात खूप नुकसान सोसावे लागेल. (Vidarbha will suffer a lot.) नवीन येणार्या केंद्र सरकारला ११९ वर्षे (119 years) जुनी असलेली स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची मागणी कायम निकाली काढण्यासाठी घटनेतील आर्टीकल ३ प्रमाणे (As per Article 3 of the Constitution ) हे राज्य तत्काळ निर्माण करण्याचा इशारा देण्यात येत आहे. या इशार्याकडे दुर्लक्ष केल्यास विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्पेâ पूर्वीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.
२८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार (Nagpur Agreement on 28 September 1953) करून विदर्भाच्या जनतेला बळजबरीने महाराष्ट्रात १ मे १९६० ला सामील करून घेतले.(Incorporated into Maharashtra on 1 May 1960) परंतु नागपूर कराराच्या कलमापैकी एकही कलम पळतांना दिसत नाही. विदर्भात बेरोजागारी ( Unemployment ) वाढली आहे. सिंचनाच्या (of irrigation) सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत. नक्षलवाद वाढत आहे. कुपोषणाची समस्या सुटली नाही. अनेक भागाचा अनुशेष अजूनही भरून काढता आला नाही. आमदार, खासदारांची संख्या कमी झाली. तरुणांचे पलायन होत आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. वीज निर्मिती केंद्र विदर्भात आहेत. प्रदुषणाचा त्रास विदर्भातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत १०० वर्ष जरी महाराष्ट्रात राहलो आणी ब्रम्हदेवाला जरी मुख्यमंत्री केले तरी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास अशक्य आहे, असेही अॅड. चटप म्हणाले.
यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ प्रदेशचे युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी सदस्य डॉ. रमेश गजभे यांच्यासह नरेश निमजे, गुलाबराव धांडे, अॅड. मृणाल मोरे, प्रशांत जयकुमार, रवींद्र भामोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
————————————————————————————————————————–
विदर्भवादी १ मे रोजी ‘काळा दिवस’ पाळणार
महाराष्ट्रवाद्यांतर्पे १ मे रोजी महाराष्ट्र दिन (Maharashtra Day on 1st May) साजरा करत असताना विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्पे १ मे रोजी विदर्भातील संपूर्ण ११ ही जिल्ह्यात ‘काळा दिवस’ ‘(black day’) पाळला जाणार आहे. १ मे रोजी दुपारी १२ वाजता विदर्भवादी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयापुढील महापुरुषांच्या पुतळ्यापुढे उपस्थित राहतील. यावेळी विदर्भवादी काळ्या पट्ट्या लावतील किंवा काळा गणवेश घालतील. यानंतर घोषणा देऊन महाराष्ट्र दिनाचा निषेध करतील. नागपुरातील हे आंदोलन व्हेरायटी चौकात सीताबर्डी (At Andolan Variety Chowk Sitabardi ) होणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्पे करण्यात आले.
———————————————————————————————————————
विदर्भाविषयी अवाक्षरही काढले नाही
लोकसभा निवडणुकीचे नुकतेच विदर्भात मतदान पार पडले. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाने विदर्भाच्या मागासलेपणाबाबत अवाक्षरही काढले नाही. त्याचा समितीतर्पे तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अॅड. श्रीनिवास खांदेवाले (Senior Economist Adv. Srinivas Khandwale ) यांनी याप्रसंगी सांगितले. विदर्भाचा कोणत्या क्षेत्रात किती अनुशेष शिल्लक आहे याची माहिती समितीतर्पेâ दिली जात आहे. विदर्भात सुशिक्षित तरुण किती बेरोजगार आहे, याची आकडेवारी सर्वप्रथम समितीनेच जाहीर केली आहे. विदर्भातील कापसावर आधारीत सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. (Cotton based yarn mills in Vidarbha have closed down. ) देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहे (Farmer suicide is happening in Vidarbha )असे सांगून डॉ. खांदेवाले यांनी केंद्रातील नवीन सरकारकडे तुम्ही काय करणार? असा प्रश्न विचारला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
————————————————————————————————————————–