दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष डोमची व्यवस्था
कळमेश्वर (Vidarbha Pandharpur) : कळमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला (Vitthal Rukmini Mandir) मोठा इतिहास आहे. येथील मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती विराजमान असल्याने यातरिर्थक्षेत्राला विदर्भात अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथे दिनांक 17 जुलै देवशयनी आषाढी एकादशी पासून यात्रा सुरू होत आहे. ही यात्रा दिनांक 22 जुलै पर्यंत चालणार आहे. त्यामुळे आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या काळात येथे भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते.
दिनांक 17 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीची यात्रा ज्याप्रमाणे पंढरपूर (Vidarbha Pandharpur) येथे भरते त्याचप्रमाणे ही यात्रा 17 तारखेपासून ते 22 जुलै पर्यंत विदर्भाचे पंढरपूर (Vidarbha Pandharpur) असलेल्या धापेवाडा येथे भरते मोठ्या संख्येने भाविक दूरवरून येथे (Vitthal Rukmini Mandir) विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शना करीता येतात. यावर्षी माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निखिल गडकरी आधी राजकीय मातब्बर नेते यावर्षी दर्शनाकरिता येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. भाविकांकरिता महाप्रसाद भव्य पार्किंग पावसामुळे भाविक ओले होऊ नये याकरिता भव्य डोमची राम झुल्यावरून व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत धापेवड्याच्या वतीने परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. सावनेर व कळमेश्वर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी राहणार आहे नुकतेच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या ठिकाणी भेट दिली प्राथमिक आरोग्य केंद्राकडूनही या ठिकाणी भाविकांच्या आरोग्य करिता स्टॉल उभारण्यात आले असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रुद्र प्रताप सिंग पवार, उपाध्यक्ष भानु प्रताप सिंग पवार, सचिव आदित्य प्रताप सिंग पवार, विश्वस्त विलास वैद्य, निखिल गडकरी, अरुण चिखले, यांनी दिली दिनांक 17 व 22 रोजी विठ्ठलाची महापूजा पुजारी प्रमोद कुलकर्णी व राजू सावरकर यांच्या हस्ते होणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.
विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना
उमरेड तालुक्यातील बेला येथे एका परिवारात एक मुलगा जन्माला आला. लहानपणापासूनच तो देवाच्या भक्तीत लीन राहत असे. त्यामुळे त्याचे नाव त्याच्या आई-वडिलांनी कोलबा ठेवले. पुढे कोलबा हा दाखवत असलेल्या चमत्कारामुळे लोकांनी त्याची ओळख कोलबा स्वामी म्हणून केली. एके दिवशी (Shri Kolba Swami) कोलबा स्वामींनी त्यांची पत्नी उसामाय यांच्यासह पंढरपूर येथे (Vidarbha Pandharpur) विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते झोपी गेले. मात्र त्याच रात्री स्वयंभू विठ्ठल त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना दृष्टांत दिला की, तू माझ्या दर्शनाला पंढरपूर येथे न येता धर्मनगरी येथे जा. सकाळी उठल्यावर विठ्ठला ने स्वप्नात येऊन सांगितलेले धर्मनगरी गाव शोधत ते धापेवाडा येथे आले.
या ठिकाणी त्यांची भेट उमाजी आबा खोलकुटे यांच्यासोबत झाली. दोघेही (Vitthal Rukmini Mandir) विठ्ठलाचे भक्त असल्याने कोलबा स्वामी (Shri Kolba Swami) व उमाजी आबा खोलकुटे यांना साक्षात पांडुरंगाने स्वप्नात दृष्टांत दिला. आपण धापेवाडा येथील चंद्रभागा नदीच्या तीरी असलेल्या बाहुली विहिरीत असल्याचे पांडुरंगाने त्यांना स्वप्नात सांगितले. त्यामुळे श्री कोलबा स्वामी आणि उमाजी आबा यांनी पहाटे सकाळी चंद्रभागेत स्नान करून बाहुली विहिरीत गेले असता, साक्षात विठ्ठल रुक्मिणी यांनी त्यांना दर्शन दिले. विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य झाल्याने विठ्ठल रुक्मिणींना दोघांनीही आमच्यासह इतरांचेही दर्शन व्हावे म्हणून, विठ्ठल रुक्मिणीला या ठिकाणी मूर्ती रूप होऊन दर्शन द्यावे, अशी इच्छा पांडुरंगाकडे त्यांनी व्यक्त केली.
पांडुरंगाने स्मित हास्य करून ते या ठिकाणी विराजमान झाले असल्याचा इतिहास आहे. नागपूरचे जाणोजीराजे भोसले यांच्या शासन काळात उमाजी आबा यांनी धापेवाडा येथे मंदिराची पायाभरणी केली आणि मंदिर उभे केले. श्री कोलबा स्वामी (Shri Kolba Swami), उमाजी आबा खोल कुटे, सच्चिदानंद स्वामी सुरत सिंह, विठ्ठलराव पैठने यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ द्वादशी शके 1962 इसवी सन 1741 रोज बुधवारला या स्वयंभू (Vitthal Rukmini Mandir) विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या काळात पांडुरंग पंढरपूर वरून (Vidarbha Pandharpur) धापेवाडा येथे भक्तांना दर्शन देण्याकरिता दरवर्षी येत असल्याची आख्यायिका आहे. धापेवाडा या गावाचे मूळ नाव धर्मनगरी होते. पुढे या नगराचा अपभ्रंश होऊन धापेवाडा असे नाव रूढ झाले.
येथे धोम्य ऋषीचा आश्रम होता आणि पांडव या आश्रमात काही काळ वास्तव्याला होते असेही जाणकारांचे मत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऋषीमुनींनी संतांनी या ठिकाणी वास्तव्य करून समाधीस्थ झाले धर्मराजाच्या नावावरून या गावाचे नाव धर्मनगरी पडले असावे असाही कयास लावला जातो. ताई पूर्वी ही धर्मनगरी धर्मपुरी नावाने ओळखली जायची वाल्मिकी रामायणामध्ये या धर्मपुरीचा उल्लेख आढळतो. प्रभू श्रीराम सिंदूर गिरी अर्थात आजच्या रामटेकला जात असताना धर्मपुरी थांबले होते, असा उल्लेख रामायणात आहे.
जगद्गुरु शंकराचार्य यांचे शिष्य धर्मशेटी रंगारी आणि मकरंद पुरी हे बनारसून धर्मनगरीत आले होते आणि काही काळ येथे वास्तव्याला होते धर्म शेट्टी यांच्या नावातील धर्म आणि मकरंद पुरी यांच्या नावातील पुरी या दोन शब्दाची संधी साधून धर्मपुरी असे नाव प्रचलित झाले असावे, असाही एक मतप्रवाह असून मंदिराच्या बाजूने गेलेल्या चंद्रभागा नदीला इतिहास आहे पूर्वीच्या कौंतलपूर येथे असलेल्या चंद्राहास राजाने तपश्चर्या केल्याने चंद्रभागा नदीचा उगम झाला कौतलपूर चा अपभ्रांश होऊन काटोल नाव प्रचलित झाले काटोल तालुक्यातील मेट पांजरा येथून चंद्रभागा नदीचा उगम झालेला आहे, हे विशेष…