आंदोलनांमुळे कामे खोळबली
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Vidarbha Patwari Association) : जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामुहीक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांनाच जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांना पाठविला आहे. त्यामुळे तात्काळ बदल्याचे आदेश रद्द करण्यात यावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात (Vidarbha Patwari Association) विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीने चिखली तहसील कार्यालयात एकदिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तालुक्यांतील ६० तलाठी आणि ९ मंडळ अधिकारी यांनी सहभाग घेतला होता.
निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, विनंती व आपसी बदल्या करणे, जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात देणे, प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी / मं. अ. यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी या शिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्यास (Vidarbha Patwari Association) विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीने दि. १८ जुलै रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.
तसेच दि. २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवशीय )Vidarbha Patwari Association_ धरणे आंदोलन, दि. २६ जुलै रोजी DSC तहसील कार्यालयात जमा करणे व दि. २९ जुलै रोजी सामुहीक रजा आंदोलन करणे, अशा विवीध मागण्या संदर्भात चिखली तालुक्यातील ६० तलाठी आणि ९ मंडळ अधिकारी यांनी सहभाग घेवून एकदिवसीय आंदोलन यसस्वी केले . यावेळी पटवारी संघटनेचे उपविभागीय अध्यक्ष विकास डुकरे, सहसचिव संजय डुकरे, तालुका अध्यक्ष परसराम सोळंके, सचिव निलेश सोनुने उपाध्यक्ष जय शिरसाट, शेजोळ मॅडम, अर्चना मॅडम, रजनी देशमुख, आदींची उपस्थिती होती .