चांदुर रेल्वे (Vidarbha rajya Andolan Samiti) : विदर्भ राज्य आंदोलन समिती चांदुर रेल्वेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दि.२८सप्टेबर २०२४ फसव्या नागपूर कराराची होळी करतांना विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा,लेके रहेंगे लेके विदर्भ राज लेके रहेंगे गगनभेदी नारे देण्यात आले. नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन ६ आठवड्याचे व्हायला हवे. अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होऊन जेणेकरून प्रश्न मार्गी लागावे .असे असतांना १० दिवसात अधिवेशन गुंडाळण्यात येते. (Vidarbha rajya Andolan Samiti) विदर्भाच्या प्रश्नावरवर चर्चा होत नाही.
पुरेशी वीज विदर्भात (Vidarbha rajya Andolan Samiti) तयार होत असतांनाच विदर्भाच्या वाट्याला लोडशेडींग , अनियमित विज पुरवठा, शेतीला रात्रीची वीज वरून आमच्या माथी अव्वाच्या सव्वा विजबिले हा अन्याय आम्ही कां म्हणून सहन करायचा ? आणि म्हणून फसव्या नागपूर कराराची होळी करण्यात आली. विभागीय अध्यक्ष अशोक हांडे,शहर अध्यक्ष बाबाराव जाधव, जिल्हा कोअर कमिटी सदस्य सुरेंद्र खेरडे,दिपक शंभरकर,एड मनोहर देशमुख, नंदकुमार देशमुख, अशोक मेश्राम, रामदास खेरडे, रमेश चौधरी,देवलाल जिभकाटेदिनकराव शिंदे उपस्थित होते.